नवी दिल्ली : इंडिया आघाडीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. त्यामुळे या बैठकीसाठी देशातील सर्वच विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत. यातच राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी ४४ हजार कोटीचं पॅकेज जाहीर
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपलं नाक पुसलं. त्यानंतर पत्रकारांनी तुम्ही कुणाची स्टाईल करता ? असं म्हटल्यावर ठाकरे म्हणाले की, मी कोणाची स्टाईल मारत नाही. सर्दी झाली आहे, उगीच हुडी, गॉगल घालून फिरत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. माझ्यासमोर कोणतीही स्वप्न नाहीत. जनता ठरवेल ते आम्ही करणार आहे. कधीतरी चेहरा ठरवावा लागेल, कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत समन्वयक ठरवणार असंही ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा…मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर
दरम्यान, आज इंडिया आघाडीत बैठक होत आहे. दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजता हॉटेलमध्ये नेते यायला सुरूवात होणार आहे. तर या बैठकीसाठी उद्धव ठाकरे कालच दिल्लीत दाखल झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचा कार्यकर्ता, जरांगेंसोबतही चांगले संबंध,” अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसोबत सरकारची रणनीती ठरली ?
हेही वाचा…“‘त्या’ व्हिडीओत बडी भाभी म्हणजे तुम्हीच का ?” सलीम कुत्ता प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी देवयानी फरांदेंना डिवचलं
हेही वाचा…“तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबणाच्या कारवाईवर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
हेही वाचा…“संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, ९२ खासदार निलंबित, राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांचाही समावेश”