पुणे : मुंबईमध्ये दहीहंडीच्या उत्सवात गोविंदानी अफझल खानाचा वध हा देखावा सादर केला होता. मात्र येत्या गणेशोत्सवात मध्ये पुण्यात या देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आङे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कोथरूड गावठाण येथील संगम तरूण मंडळ ट्रस्टच्या वतीने अफझल खानाचा वध सादर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन येथून ती परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यावर आता या वादात मनसेने उडी घेतली आहे.
“राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यावर मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करीत असे म्हटले आहे की, अफजल खानाच्या वधाचा जिवंत दाखवण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. अफजल खानाबद्दल कोणाला प्रेम आहे आणि ते जर असेल तर अशा औलादी महाराष्ट्रात पोसता कामा नयेत. हे सरकार हिंदुत्वाच नाव घेऊन सत्तेत आलं आहे. याचा विसर पडता कामा नये. पोलिसांनी असे तुघलकी निर्णय घेऊ नयेत. असंही ते म्हणाले.
“त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आम्ही देखावा सादर कऱणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अॅड, किशोर शिंदे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, आम्ही मागील 20 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील घटना व प्रसंगावर आधारीत देखावे सादर केले आहेत. यावर्षी आम्ही अफजलखानाचा वध हा देखावा सादर करणार आहोत. त्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही आम्ही देखावा सादर करणार आहोत.
“केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत गोविंदाना खेळाडूच्या कोट्यातून पाच टक्के आरक्षण जाहीर केलं आहे. त्यावरून आता राज्यात स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप नोंदवला असून त्यांनी आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांनी देखील यावर विरोध दर्शविला आहे.
Read also
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- “फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
- हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड