सातारा: महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातारा जिल्ह्यात स्थित असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी साखर कारखाना होता. मात्र अडचणीच्या काळात महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं.ईडीने १२ दिवसांपूर्वीच जरंडेश्वर कारखाण्याची ६५.७५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
हे पण वाचा, गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे बेरजेचे राजकारण
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी देशभर सहकार चळवळीचे जाळे पसरले मात्र त्यावर नियंत्रण आणण्यासाठी स्वायत्त संस्था उभारल्या गेल्या. त्यातून सहकार महर्षी ऐवजी संस्थानिकांची झाली. याला कृषी, शिक्षणक्षेत्र देखील अपवाद ठरलेले नाही. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्त वसुली संचालनालयाने (ईडीने) नोटीस पाठवत ‘जोर का झटका धीरे से लगा’ याचा पुरेपूर अनुभव दिला. याबाबत खुलासा करण्याऐवजी राष्ट्रीय पातळीवरच्या नाबार्ड पुरस्काराचे तुणतुणे जिल्हा बँकेच्या वतीने वजनव्यात आले असले तरीदेखील राज्यभर जिल्हा बँकेला आलेल्या ईडीच्या चौकशीच्या नोटिसीचीच चर्चा जोरदार झालेली आहे.
हे पण वाचा, “जरंडेश्वर संपवण्याचा प्रयत्न केला तर ईडीला आमचा हिसका दाखवू”; शशिकांत शिंदेचा ईडीला इशारा
हे पण वाचा, जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस
सातारा जिल्हा बँकेने यासंदर्भात एक पत्रकार परिषद देखील . मात्र या पत्रकार परिषदेचा टायमिंग तीनदा बदलावा लागला. वारंवार मागणीकरूनही पत्रकारांना देखील ही नोटीस दाखवण्यात आली नाही. त्या नोटिसीच्या विरोधात, बँकेच्या समर्थनार्थ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सारवासारव करावी लागली. नोटीसमध्ये काय आलेले आहे हे मात्र कोणीही सांगितले नाही. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेला आलेल्या नोटिसीच्या गोडबंगलाबाबत चर्चेला तोंड फुटले आहे. जोपर्यंत चौकशीमध्ये काही सिद्ध होत नाही तोपर्यंत बँकेवर टांगती तलवार राहणार हे मात्र नक्की आहे.
हे पण वाचा,
जरंडेश्वर कारखाना: १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाची नोंद अन् शेतकरी आणि ऊस पुरवठादार चिंतेत
“अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व”, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने उडवली खिल्ली
“अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने लक्ष घातलंय ना…आता सगळं काही बाहेर निघेल”
“अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”