शिर्डी : राष्ट्रवादीचं शिर्डी येथील अधिवेशन झाल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असं भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून आगामी काळात राष्ट्रवादी फुटेल यावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादीचेच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
“आता पोलिस भरती, महिनाभरात ग्रामविकास विभागाची भरती”; फडणवीसांनी विरोधकांची केली बोलती बंद
राष्ट्रवादीचं शिर्डी येथे आजपासून अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला राज्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हजेरी लावणार आहे. त्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी सरकार पडणार असल्याचं विधान केले आहे. शिर्डी येथे एक अधिवेशन झालं. त्यानंतर सरकार पडलं. आताही राष्ट्रवादीचं अधिवेशन होत आहे. त्यानंतर सरकार पडेल. तसेच पक्ष फुटीवर बोलताना ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात सर्वात भक्कम, खंभीर म्हणून राष्ट्रवादीचा पक्ष आहे. त्यामुळे तो फुटायचा प्रश्नच नाही. असंही ते म्हणाले.
“बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे शिंदे-फडणवीसाचं काम”
तसेच आज कार्तिकी एकादशी निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुर येथे दाखल झाले आहेत. त्यावरून अमोल मिटकरी यांनी देखील जयंत पाटील यांच्यासारखचं भाकित केलं आहे. ते म्हणाले की, कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पांडुरंगाची महापुजा करणार आहेत. मात्र येणाऱ्या आषाढी एकादशीची शासकीय महापुजा महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्रीच करतील. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
“कडू झालेले तोंड गोड करण्यासाठी सपन प्रकल्पाला मंजूरी.!” काॅंग्रेसने बच्चू कडूंना डिवचलं
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी आज राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिर्डी येथे दाखल झाले आहेत. मात्र अध्यक्ष शरद पवार यांची तब्बेत ठिक नसल्या कारणाने त्यांना मुंबईतील ब्रींच कॅंन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना न्युमोनिया देखील झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.
Read also
- राज्यात वेदांता, एअरबसवरून महाभारत सुरू असताना अजित पवार गायब..! आहेत तरी कुठे?
- महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातली विकृती
- “मग मिश्या काढणाऱ्याना नपुंसक समजतात का ?” राष्ट्रवादीचा भिडेंना खोचक सवाल
- “दोन कोटीचं घड्याळ सापडलं ते कुठं होतं..”; सुषमा अंधारेंची सोमय्या स्टाईल टोलेबाजी
- “दादा तुम्ही फक्त पुण्याचे मंत्री नाही, महाराष्ट्राकडेही लक्ष्य द्या”