IMPIMP
Sun vs Sasra Asa Ranganar Samaan Eknath Khadsen hints at contesting Lok Sabha elections Sun vs Sasra Asa Ranganar Samaan Eknath Khadsen hints at contesting Lok Sabha elections

“सुन विरूद्ध सासरा असा रंगणार सामना, एकनाथ खडसेंनी दिले लोकसभा निवडणुक लढण्याचे संकेत”

जळगाव : भाजपसोबत मतभेद झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला. त्यानंतर शरद पवारांनी लगेचच त्यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली. तर सुन रक्षा खडसे सध्या भाजपमध्येच असून त्या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. अलिकडेच फक्त खडसे नावावरून पक्षातून डावलण्यात येत असल्याचं खंत रक्षा खडसे यांनी बोलून दाखवली होती. यातच आता पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचे संकेत एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. त्यामुळे सासरा विरूद्ध सून असा सामना आगामी लोकसभा निवडणुकीत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा“कितीही वेळा हिनवून ही तुम्हीच मराठा आरक्षणाचा वजीर आहात”, अन् फडणवीसांसाठी आमदार सरसावले

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक राजकीय गणित बदलली आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट आता भाजपसोबत सत्तेत गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा दुसरा गट विरोधात आहे. यातच आता आगामी निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहेत. यातच आता रावेर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी आग्रही मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे या लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार का ? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका

१९७९ ते २०१९ पर्यंत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काॅंग्रेसला एकदाही जिंकता आलेली नाहीय. रावेरमध्ये गेल्या अनेक निवडणुकांत काॅंग्रेस पक्ष हारत आला आहे. काॅंग्रेस पक्षाची हार ही मोठ्या मतांच्या फरकाने झाली असून २०१४ मध्ये तर साडेचार लाख, तर २०१९ मध्ये तीन लाख मतांच्या फरकाने हारली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसला मिळावी.  पक्षाने मला तिकीट दिलं तर प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवधनुष्य उचलण्याची आपली तयारी असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका 

दरम्यान, एकनाथ खडसे पुढे बोलतांना म्हणाले की, आमची काॅंग्रेस पक्षाला विनंती आहे की, एक वेळ ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला द्यावी. तुम्ही जवळपास दहा निवडणुका या तीन ते चार लाख मतांच्या फरकाने हरला आहात. त्यामुळे आता रावेरमधून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने लढावे असा आमचा आग्रह आहे.  असं म्हणत जागावाटपाचा निर्णय हा इंडिया आघाडीच्या बैठकीत होणार असून याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईल. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा 

हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या

हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

हेही वाचा…“खासदार सुनिल तटकरे यांना तात्काळ निलंबित करा,’ सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी