मुंबई : महिलांबाबत अश्लिल शब्दात राज्यातील मंत्री टिका करीत आहे. ही बाब विधीमंडळात विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायला हवी होती. असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार यांचं गाऱ्हाणं मांडलं. त्यानंतर राष्ट्र्वादीच्या अनेक नेत्यांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात. त्यातच आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? असा खोचक सवाल करीत त्यावर भाष्य केलं आहे. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, पुण्यातील ‘ही’ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत
“त्या कार्यक्रमाच्या वेळी मी अजित दादांच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. त्यावेळी ज्या सभागृहात मी नाही, जिथं बोलू शकत नाही. त्याठिकाणी माझ्यावतीने विरोधी पक्षनेत्यांनी बोलावं. मग विरोधी नेते फक्त दादा आहेत का ? ह्या सर्व बातम्या माध्यमांनी केलेल्या बातम्या आहेत. त्यामध्ये कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यात दादांच्या नावाचा उल्लेख नाही आहे, ती अपेक्षा सगळ्यांकडून आहे. मग ती अपेक्षा आमच्या उपसभापतीकडूंनही आहे.” असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा…शिवसेना नेमकी कुणाची? कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे टाकला चेंडू, काय घडणार, काय होणार ?
अजित पवार यांनी सुषमा अंधारे यांच्यावर भाष्य केल्यानंतर त्या म्हणाल्या की, दादा तुम्ही आमचे आहेत. तुमचा आमच्यावर हक्क आहे. आम्ही आपुलकीने आपल्यावर बोलत राहावं, आपण आम्हाला पारखं करू नये. सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? ठाकरे गटात आहेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे आहेत. पवारांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघतायेत, काकारे, मामारे करत ज्या पक्षासाठी भाषण करतात. त्यांच्या उद्धव ठाकरेंना सांगा. उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या आण अंबादास दावनेंंना मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता तर योग्य ठरले असते. विधानसभा विरोधी पक्षनेत्याप्रमाणे विधान परिषदेच्या पक्षनेत्यालाही अधिकार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…“सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं”, अजित पवारांचा पलटवार
हेही वाचा…निवडणुकांचा बिगूल…. “राष्ट्रवादीने याचिका मागे घेतल्यास लगेच महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील”
हेही वाचा…कोश्यारी गेले, बैस आले, पण, त्या ‘१२’ आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा मोठा निर्णय
हेही वाचा…“निकाल ठाकरेंच्या विरोधात, पण अजित पवारांनी पटोलेंवर हात धुवून घेतले”, एकच चर्चा
हेही वाचा…जंयत पाटलांना इडीची नोटीस, राज ठाकरेंनाही त्याच कंपनीसंबंधी आली होती नोटीस, ‘ती’ कंपनी कोणती ?