मुंबई : शिवसेनेच्या १९ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्याने शिंदेंचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने याबाबतचा निर्णय शिंदेंच्या बाजूने झुकण्याची शक्यता अधिक आहे. याबाबत गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यात पुण्यातून अनेक आमदारांच्या नावांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा”
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? याबाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. तर भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर, सुनील कांबळे या आमदारांची नावे सध्या चर्चेत आली आहेत. तर पिंपरी-चिंचवड मधून आमदार महेश लांडगे तर जिल्ह्यातून राहुल कुल यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…कोश्यारींना कोर्टाने फटकारले, भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ४३ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण २० मंत्री सध्या कार्यरत आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात २३ नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. शिंदेंसोबत गेलेल्या ५० आमदारांपैकी ९ जणांना पहिल्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. माहितीनुसार एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतच्या १४ जणांना मंत्रिपदाची संधी देऊ शकतात. तर भाजपामध्ये मंत्रिपदासाठी अनेक उत्सुक आहेत. परंतु इच्छुक नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यात बैठका होतील . त्यानंतर दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाल्यानतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा….“शिंदे सरकार वाचलं, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो”, जंयत पाटलांनी घेतला शिंदेंचा चिमटा
दरम्यान, सध्याच्या मंत्रिमंडळात एकही अपक्ष आमदार नाही. ज्यांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत महिला नेत्याचाही समावेश नाही. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले आहे. त्यामुळे यांचा समावेश यावेळी नक्की होऊ शकतो.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना नेमकी कुणाची? कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे टाकला चेंडू, काय घडणार, काय होणार ?
हेही वाचा…“सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल”, निकालानंतर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया
हेही वाचा….“माझ्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केल्याने मित्र नाराज झालेत”, शरद पवारांचं वक्तव्य
हेही वाचा…आता ठरलंच..! शिंदे- भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संपु्र्ण विस्तार होणार ?
हेही वाचा…“लोकशाही वाचवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज”, शरद पवार