मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने १० आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. त्याआधी निवडणुक आयोगाने शिवसेना आणि पक्षाचं निवडणुक चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय घेतला. यात कालच्या सुनावणीतही न्यायालयाने शिवसेना आणि पक्ष चिन्ह हा देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला. त्यावर आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…कोश्यारींना कोर्टाने फटकारले, भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार मान्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानताना अधिकृत शिवसेना हा राजकीय पक्ष शिंदेंचा की ठाकरे यांचा यावर आधी निर्णय घेण्यात येणार आहे. प्रतोदची नियुक्ती विधिमंडळ पक्ष नव्हे तर राजकीय पक्ष करतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्या प्रतोदला मान्यता द्या असे न्यायालयाने म्हटलेले नाही. आधी शिवसेना हा राजकीय पक्ष कोणाचा याबाबत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. असे न्यायालयाने म्हटलेले आहे. त्यावर आधी पक्ष कोणाचा आहे ते ठरवले जाईल आणि त्यानंतर प्रतोद ग्राह्य धरायचा हे ठरेल असे राहूल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा….“शिंदे सरकार वाचलं, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो”, जंयत पाटलांनी घेतला शिंदेंचा चिमटा
बहुमतच्या आधारे निवडणुक आयोगाने शिवसेना आणि पक्ष चिन्ह हे शिंदे गटाला बहाल केले. त्यावर ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. काल सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना ह्या संबंधात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता राहूल नार्वेकर याबाबत काय निर्णय देणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल, उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेचा फडणवीसांनी पाठ वाचला, ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर याबाबतही काय निर्णय घेणार? त्यावर सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल”, निकालानंतर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया
हेही वाचा….“माझ्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केल्याने मित्र नाराज झालेत”, शरद पवारांचं वक्तव्य
हेही वाचा…आता ठरलंच..! शिंदे- भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संपु्र्ण विस्तार होणार ?
हेही वाचा…“लोकशाही वाचवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज”, शरद पवार
हेही वाचा…“न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा”