मुंबई : महिलांबाबत अश्लिल शब्दात राज्यातील मंत्री टिका करीत आहे. ही बाब विधीमंडळात विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायला हवी होती. असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार यांचं गाऱ्हाणं मांडलं. त्यानंतर राष्ट्र्वादीच्या अनेक नेत्यांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात. त्यातच आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? असा खोचक सवाल करीत त्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…शिवसेना नेमकी कुणाची? कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे टाकला चेंडू, काय घडणार, काय होणार ?
सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? ठाकरे गटात आहेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे आहेत. पवारांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघतायेत, काकारे, मामारे करत ज्या पक्षासाठी भाषण करतात. त्यांच्या उद्धव ठाकरेंना सांगा. उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या आण अंबादास दावनेंंना मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता तर योग्य ठरले असते. विधानसभा विरोधी पक्षनेत्याप्रमाणे विधान परिषदेच्या पक्षनेत्यालाही अधिकार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा…“सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल”, निकालानंतर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया
दरम्यान, एका छोटेखानी सुषमा अंधारे यांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आल्या. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी महिलांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्याची तक्रार शरद पवार यांच्यासमोरच केली. त्यावेळी सुषमा अंधारे ह्या शरद पवारांसमोरच भावूक झालेल्या दिसून आल्या.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकांचा बिगूल…. “राष्ट्रवादीने याचिका मागे घेतल्यास लगेच महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील”
हेही वाचा…कोश्यारी गेले, बैस आले, पण, त्या ‘१२’ आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा मोठा निर्णय
हेही वाचा…“निकाल ठाकरेंच्या विरोधात, पण अजित पवारांनी पटोलेंवर हात धुवून घेतले”, एकच चर्चा
हेही वाचा…जंयत पाटलांना इडीची नोटीस, राज ठाकरेंनाही त्याच कंपनीसंबंधी आली होती नोटीस, ‘ती’ कंपनी कोणती ?
हेही वाचा…“निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, पुण्यातील ‘ही’ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत