नाशिक : भाजप नेते किरीट सोमैय्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या सोमैय्यांनी भुजबळांच्या ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीची पाहणी केली. यांनतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांवर जोरदार हल्लबोल केला असून, त्यांच्याशी संबंधित अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी? दिलीप मोहिते-पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर
“सांताक्रुझमध्ये भुजबळांची ९ मजली इमारत आहे. त्यात भुजबळ कुटुंब राहते. पण, या इमारतीची मालकी कागदावर परवेज कन्स्ट्रक्शनची आहे. या बिल्डिंगचा आणि परवेज कन्स्ट्रक्शनचा त्यांच्याशी काय संबंध? मुंबईत एक खोली कुणी कुणाला देत नसताना यांना ९ मजली इमारत कशी दिली? भाडं कोण भरतं? की ही इमारतच तुमची आहे? असेल तर बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे अनेक सवाल करत, “ही बोगस कंपनी असून, चालवणारे लोक बनावट आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.
“…तर देशात लसीकरण शक्य नसतं आणि देश कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेला असता” – फडणवीस
तसेच, २०१३ मध्ये ‘आर्मस्ट्राँग’ची मी पाहणी केली असता, भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं. आज पुन्हा आम्ही पाहणी केली. तेव्हा ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रा’, ‘आर्मस्ट्राँग एनर्जी’ने मालेगाव मधली ‘गिरणा शुगर मिल’ विकत घेतली आहे. ही मिल भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता असून, यात जो पैसा आला तो कुठून आला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे, त्यांनी भुजबळांच्या इमारतीचे मालक कोण सांगावे,” असं आव्हान दिलं आहे.
राणे-सेना वादानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप!
दरम्यान, त्यांनी भावना गवळींच्या ट्रस्ट संदर्भातही गंभीर आरोप केले असून, गवळी यांनी ७० कोटींची ट्रस्ट गैरपद्धतीनं त्यांच्या पीएच्या नावावर केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे, तर १२० कोटींच्या मालमत्ता जप्ती प्रकरणी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि या डर्टी ११ नंतर १२ नंबर जितेंद्र आव्हाड यांचा लागणार आहे,” असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Read Also :
- “…तर ५ सप्टेंबरला जलसमाधी घेऊ,” राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; पंचगंगा परिक्रमा सुरू
- मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया
- मविआ नेते राज्यपालांना भेटणार? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता!
- “थांबा, दिवाळीनंतर आमचेच सरकार राज्यात येईल” रोहित पवारांच्या मतदारसंघात सुजय विखेंना गुदगुल्या
- अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…