पुणे । विशेष प्रतिनिधी बैलगाडा घाटात घोडीवर बसलेला गडी बैलांना दिशा दाखवतो. मात्र, कधीतरी घोडीवर बसून, नंतर गायब होणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. उद्या एखादा घोडीवाला येईल आणि तात्पुरता घोडीवर बसेल. पण, उद्या आपल्याला पक्का घोडीवाला पाहिजे. घोडीवाल्यावर लक्ष ठेवा नाहीतर कधी गाडा पलटी होईल सांगता येणार नाही, अशी अप्रत्यक्ष टीका पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा…” आता भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली खुर्द येथे ‘‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत’’चे आयोजन केले आहे. महिंद्रा थार, ट्रॅक्टर आणि दुचाकी अशी भव्य बक्षीसे असलेल्या या शर्यती पाच दिवस होणार आहे. या शर्यतीकरीता पंचक्रोशीतील शेतकरी, गाडाप्रेमी नागरिकांनी प्रचंड गर्दी आहे. या घाटावर बोलताना बांदल यांनी डॉ. कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
विशेष म्हणजे, व्यासपीठावर राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि वडगाव शेरीची आमदार सुनील टिंगरे हेसुद्धा उपस्थित होते. या व्यासपीठावरच बांदल यांनी डॉ. कोल्हे यांना लक्ष्य केले. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.
राज्यात बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली. त्यानंतर आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गाड्यापुढे घोडी धरली होती. किंबहुना, शर्यती सुरु झाल्यानंतर पहिली घोडी आपण धरणार… असा संकल्प डॉ. कोल्हे यांनी केला होता. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बांदल यांची सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषणांचा अंदाज घेतल्यांतर बांदलांनी राष्ट्रवादी आणि डॉ. कोल्हे यांच्याविरोधात राजकीय दांडपट्टा सुरू केल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन
शिरुरमध्ये राष्ट्रवादी बांदलांच्या निशाण्यावर..?
सुमारे २२ महिने तुरुंगात असलेले पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. जेलमधून बाहेर येताच बांदलांनी एक डाव भूताचा झाला. आताचा देवाचा आणि माझा दुसरा डाव असेल. तसेच, ‘राजकीय हिसाब तो जरूर पुरा करेंगे,’ असे म्हणत आपल्या राजकीय विरोधकांना इशारा दिला होता. बांदल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत पोचलेले आणि राष्ट्रवादीकडून शिरुर लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक राहिलेल्या बांदलांना पक्षविरोधी कारवायांचे कारण सांगून पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणुकीसह खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय मांढरे यांच्या तक्रारीवरूनच माजी सभापती मंगलदास बांदल यांना जेलची हवा खावी लागली. या प्रकरणात राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी बांदल यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध मंगलदास बांदल यांनी मोहीम उघडली आहे.
हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात
शिवाजीराव आढळराव पाटलांचे पारडे जड…
शिरूर लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विरोधात टिकेची झोड उठवणारे मंगलदास बांदल यांनी अढळरावांच्या विरोधात राजकीय राळ उठवली होती. राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात बांदल यांचे योगदान होते. मात्र, ज्यांच्यावर त्यांनी निवडणुकीत जहरी टीका केली ते माजी खासदार आढळराव पाटील पहिल्यांदा बांदल यांची विचारपूस करायला आणि भेट घेण्यास घरी गेले. ज्यांच्यासाठी मी आढळराव पाटील यांच्या विरोधात वैर पत्करले त्यांनी डुंकूनही माझ्याकडे पाहिले नाही. आढळराव पाटील यांनी मात्र माझी खुशाली विचारली. यापुढील काळात आढळराव पाटील यांच्यासाठीच आपण काम करणार असल्याची अप्रत्यक्ष भूमिका मंगलदास बांदल यांनी घेतलेली पहायला मिळत आहे. शिरुर आणि हवेली तालुक्यात बांदल यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बांदलांची साथ आढळराव पाटील यांच्या पथ्थ्यावर पडणार असून, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Read also
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा, भाजप आमदाराचं गजब विधान
हेही वाचा…डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे, 1992 साली डेव्हलप झालेला फॉंन्ट 1983 च्या सर्टिफिकेवर कसा ?
हेही वाचा…“रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कसं करणार ? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनीच गळ घातली”
हेही वाचा…“आता भाईजान उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका करण्याची लायकी राहिली नाही”, नवनीत राणा
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा