मुंबई : आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं गरम झालं आहे. महाविकास आघाडीकडून संपुर्ण राज्यात वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंकडून राज्यात गौरव यात्रा काढली जात आहेत. यातच काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…“दोन दिग्गज आले, म्हणजे चर्चा तर होणारच,” शरद पवार नितीन गडकरींच्या भेटीला
गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि संजय शिरसाठ प्रकरण राज्यात चर्चेत आलं आहे. यातच आता सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाठ यांच्यावर अब्रुनुसानीचा दावा ठोकला आहे. त्यावर बोलतांना संजय शिरसाठ म्हणाले की, सुषमा अंधारे हा प्रकरण आता माझ्यासाठी संपलेला विषय आहे. ती बाई सर्व प्रसिद्धीसाठी करत आहे. तिला आता सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे. राष्ट्रपतीकडे जायचं आहे. तो तिचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर आता मी जास्त काही बोलणार नाही. असंही संजय शिरसाठ यांनी म्हटलं.
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज
काल छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यावर बोलतांना त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. काल वज्रमुठ सभेत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे नेते व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांची मजा घेण्यासाठी बसले होते. हे कधीही एकत्र होऊ शकणार नाही. काल नाना पटोले सभेला येऊ शकले नाहीत. काॅंग्रेसमध्ये आता एकवाक्यता राहिलेली नाही. नाना पटोले, बाळासाहेब थोरात अन् इतर काॅंग्रेस नेत्यांचं काही एकमेकांसोबत जमत नाही. यातच लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील. इतका मोठा नेता असूनही त्यांना मान दिला जात नाही. त्यामुळे ते निश्चितच भाजपमध्ये जातील असा दावा संजय शिरसाठ यांनी केला.
Read also
हेही वाचा…” आता भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन
हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…“दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला?” सुनील राऊतांचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं