पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे दोन जण पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना दारूच्या नशेत धमकी देण्यात आली असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यावर आता आमदार सुनील राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल
सुनिल राऊत म्हणाले की, दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला? महाराष्ट्रात भरपुर लोक आणि नेते आहेत. मग त्याने संजय राऊत यांनाच धमकी का दिली? सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणाचे सुत्रधार पुण्यात सापडले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही गोष्टी गंभीररीत्या घेत प्रामाणिक कारवाई करावी. असं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप
संजय राऊतांना जी धमकी आली ती खरी आहे. याचा तपास केला असता एका व्यक्तीला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्या व्यक्तीने अशाप्रकारे धमकी दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र संपुर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरी देखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नाहीत. असं फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणात पुण्यातून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णाई या कुख्यात टोळीच्या नावान धमकीचा मॅसेज आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीस ताब्यात घेऊन, मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल तळेगाव वय २३ रा. वडगाव शेरी. पुणे असे संबंधित तरूणाचे नाव असून पुणे पोलिसांना त्यास पुढील तपासाकरीता मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी शनिवारी दिली आहे.
Read also
हेही वाचा…“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं
हेही वाचा…“दोन दिग्गज आले, म्हणजे चर्चा तर होणारच,” शरद पवार नितीन गडकरींच्या भेटीला
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज
हेही वाचा…“शिवसेना गटाचे नेते अद्वय हिरेंसह ३० जणांवर फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल,” मालेगावची सभा झाली अन्…
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती