पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे दोन जण पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच पार्श्भूमीवर आता राज्यातील राजकारण एक वेगळ्याच दिशेने गेलं आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
संजय राऊतांना जी धमकी आली ती खरी आहे. याचा तपास केला असता एका व्यक्तीला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्या व्यक्तीने अशाप्रकारे धमकी दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र संपुर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरी देखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नाहीत. असं फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणात पुण्यातून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णाई या कुख्यात टोळीच्या नावान धमकीचा मॅसेज आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीस ताब्यात घेऊन, मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल तळेगाव वय २३ रा. वडगाव शेरी. पुणे असे संबंधित तरूणाचे नाव असून पुणे पोलिसांना त्यास पुढील तपासाकरीता मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी शनिवारी दिली आहे.
Read also
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ