मुंबई : खासदार संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर राज्यात दंगली होणं ही खुप गंभीर बाब आहे. देवेंद्रफ फडणवीस यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना लगावला आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
भाजपने महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असा टोला सुप्रिया सुळे यांना टोला हाणला आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यांना लक्ष्य केलं आहे. तुमची सत्ता असताना तुमचे नेते, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटींची वसुली प्रकरणात तुरूंगात गेले होते. मागील अडीच वर्षात राज्यात नांदेड, अमरावती, दंगली उसळल्या तेव्हा तुम्हाला गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर तुमची सत्ता असताना सचिन वाझे सारखा पोलीस अधिकारी उद्योपतींच्या घरांसमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवतो. तेव्हा नाही दिसली का गृहमंत्र्यांची निष्क्रियता? असा खोचक सवालही भाजपने केला आहे.
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान
त्याचबरोबर मागील अडीच वर्षात कोविड काळात २०० च्या पोलिसांवर हल्ले झाले. तेव्हा दिसली नाही का निष्क्रियता ? तुमच्या सत्ता काळात लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा वापर वसुलीसाठी करण्यात आला. तेव्हा काहीच वाटलं नाही का ? दंगली, वसुली, ट्रॉन्सफर रॅकेट चालवणाऱ्यांना पाठीशी तुम्ही घातलं तेव्हा निष्क्रियता वाटली नाही का ? असाही सवाल भाजपने केला.
.. @supriya_sule , तुमची सत्ता असताना तुमचे नेते, तत्कालीन गृहमंत्री @AnilDeshmukhNCP 100 कोटींची वसुली प्रकरणात तुरूंगात गेले होते. मागील अडीच वर्षात राज्यात नांदेड, अमरावती , दंगली उसळल्या तेंव्हा तुम्हाला गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का?
1/3 pic.twitter.com/hphvNAGcaK
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 1, 2023
Read also
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित