मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे दोन जण पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच पार्श्भूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊतांना राज्य सरकारने तातडीने झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे. अशी माझी सरकारकडे आग्रहाची विनंती आहे. संजय राऊत यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अशी कुणाची हिमंत होते. ? असा संप्तत सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. संजय राऊतांना अशा पद्धतीने धमकी येणं है दुर्दैव आहे. परंतु अशी हिमंतच कुणामध्ये होते. या मध्ये गृहमंत्र्यांचं अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्यांमुळे चांगलचं चर्चेत आलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली आहे. त्यातच आता संजय राऊतांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे
पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. मोबाईलवर मेसज करून संजय राऊतांनी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊतांनी हा मेसेज आला आहे. दिल्ली में मिल AK-47 से उडा दुंगा असं मॅसेज म्हटलं आहे. संजय राऊतांना धमकी देणारा पुण्यातील असल्याची प्रथामिक माहिती सध्या मिळत आहे. या प्रकरणाबाबत पुण्यातील दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संजय राऊतांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
Read also
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या