छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राड्यामागे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय शिरसाट यांनी केला आहे. दोन दिवसांपुर्वी संभाजीनगर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यावर आता संजय शिरसाठ यांनी जलील यांच्यावर आरोप केले आहेत.
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात रात्री दोन वाजता दंगल घडली होती. यामध्ये दोन्ही गटातील तरूणांनी जाळपोळ केली. त्यामुळे शहरात तणावर निर्माण झाला होता. यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या होत्या. त्यावर किराडपुरा परिसरातील दंगल ही कोणी घडवून आणली हे सगळ्यांना माहिती आहे. इम्तियाज जलील हे रात्री किराडपुरा भागात का गेले होते? ही दंगल घडवून आणण्यात जलील यांचा हात आहे. इम्तियाज जलील यांनी हे सर्व घडवून आणले. इत्मियाज जलीलला लोकांनी वाचविले. असंही संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
जैसी करणी वैसी भरणी. इत्मियाजने ऐवढ्यातून सुद्धा मी तेथे होतो हे दाखविण्यासाठी शुट केले. इतर मुस्लिम नेते सुद्धा शहरात आहेत. ते या दंगली संदर्भात का वक्तव्य करत नाहीत ? असा सवाल संजय शिरसाठ यांनी केला आहे. तसेच या राड्यामागे इत्मियाज जलील यांचा हात असल्याचा आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे. त्यावर आता जलील काय उत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ?
Read also
हेही वाचा…“जयंतराव..! आजकाल भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला”
हेही वाचा…गिरीश बापट यांचा वारसा कोण चालणार ? पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची लॉंर्बिंग सुरू
हेही वाचा…आता कुणालाही सोडणार नाही, माझं गृहमंत्रीपद अनेकांना खुपतं ;” देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल