मुंबई : गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमनेसामने आले आहेत. यातच महाविकास आघाडीने सरकारने गेल्या अर्थसंकल्पाचे मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात – ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून १० कोटी करण्यात आली. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप सरकार करत आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यावर आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
जयंत पाटील यांना भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की, जयंतराव आजकाल भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला काय तुम्ही? राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात मागासवर्गीय समाजासाठी कधीच एवढी मोठी तरतूद करण्यात आली नव्हती. 2023- 24साठी तब्बल 16,494 कोटींची तरतूद मागासवर्गीयसाठी करण्यात आली आहे. जयंतराव , या बजेट मध्ये सामाजिक न्याय विभागासाठी निधीमध्ये सुमारे 30% वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मागील 4 वर्षातील बजेट पेक्षा जास्त आहे. गेल्या 4 वर्षांत जी तरतूद अनुक्रमे 9208 कोटी रुपये, 9668 कोटी रुपये, 10,635 कोटी रुपये, 12,230 कोटी रुपये इतकी होती.
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
2013 – 14 च्या बजेट मध्ये तुमच्या सरकारने मागासवर्गीय समाजासाठी केलेली 4,787 कोटी एवढी होती. या तरतुदींच्या जवळपास तीन पट एवढी आहे. यावर्षी 2023-24 मध्ये 16,494 कोटी रुपये इतकी आहे. ही वाढ जवळपास 30 %आहे. जयंतराव एवढी वर्षे हातचलाखी केली , अजूनही राज्यातील जनतेला खोटं बोलून, भ्रमित करत आहात. एखाद्या योजनेला प्रतिसाद मिळत नसेल तर, त्या योजनेत वाढीव तरतूद करून काय साध्य करतात? मागील अडीच वर्षाच्या काळात तुम्ही ढीगभर घोषणा केल्या. पण, जनतेच्या हातात भोपळाच पडला होता.
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
‘स्टँड अप इंडिया’या योजनेत मागासवर्गीय तरुणांना उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी 2019-20 मध्ये 25 कोटी रुपये तरतूद करण्यात आली,मात्र खर्च एकही रुपया झाला नाही. 2020-21 मध्ये 25कोटींची तरतूद आणि 6.83 कोटी रुपये खर्च, 2021-22 मध्ये 75 कोटींची तरतूद आणि खर्च 5.69 कोटी रुपये 2022-23 मध्ये 100 कोटींची तरतूद केली. मात्र, प्रतिसाद नसल्याने खर्च झालेला नाही. त्यामुळे यावर्षी 10 कोटींची तरतूद करण्यात आली. अनुसूचित जातीतील तरुणांच्या शिष्यवृत्तीची परिस्थिती देखील तशीच आहे. शिष्यवृत्तीसाठी 2019-20 मध्ये 50 कोटी तरतूद आणि 181 लाभार्थी 2020-21 मध्ये 24 कोटी तरतूद आणि 139 लाभार्थी, 2021-22 मध्ये 100 कोटी तरतूद आणि 53 कोटी खर्च, 2022-23 मध्ये 150 कोटी रुपये तरतूद आणि 55 कोटी रुपये खर्च अशी स्थिती आहे. @Jayant_R_Patil , मागासवर्गीय वस्ती सुविधांच्या बाबतीत सुद्धा तीच स्थिती आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
2019-20 मध्ये 300 कोटी तरतूद फक्त 173 कोटींचा खर्च, 2020-21 मध्ये 125 कोटी रुपये तरतूद खर्च फक्त 41 कोटी रुपये, 2021-22 मध्ये 1000 कोटी रुपये तरतूद खर्च फक्त 650 कोटी रुपये, 2022-23 मध्ये 1200 कोटी रुपये तरतूद आणि 840 कोटी रुपये खर्च. खर्चाच्या प्रमाणातच तरतूद केली आहे. जयंतराव अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पीय तरतुदी केल्या जातात. एखाद्या योजनेत खर्च वाढत गेल्यास पुरवणी मागण्यांमधून पुन्हा त्यासाठी तजवीज केली जाते. हे तुम्हाला माहिती असूनही खोटं , भ्रमित करणारं ट्विट तुम्ही केलात. इंदूमिल स्मारकासाठी 741 कोटी रुपये देण्यात येतील, असा उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातच उल्लेख आहे. त्यामुळे इंदू मिल मधील स्मारकाची चिंता तुम्ही करू नका. स्मारक बांधण्यास सरकार समर्थ आहे. तेवढं जनतेला खोटं सांगून फसवू नका.
जयंतराव आजकाल भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला काय तुम्ही? @Jayant_R_Patil ,राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात मागासवर्गीय समाजासाठी कधीच एवढी मोठी तरतूद करण्यात आली नव्हती.
2023- 24साठी तब्बल 16,494 कोटींची तरतूद मागासवर्गीयसाठी करण्यात आली आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 31, 2023
Read also
हेही वाचा…गिरीश बापट यांचा वारसा कोण चालणार ? पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची लॉंर्बिंग सुरू
हेही वाचा…आता कुणालाही सोडणार नाही, माझं गृहमंत्रीपद अनेकांना खुपतं ;” देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ