पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक होणार आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापुर्वीच आता गिरीश बापट यांचा वारसा कोण? अशी चर्चा पुण्यात रंगली आहे.
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक लॉर्बिंग भाजपमध्येच सुरू असल्याचं दिसून येत आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेत आहेत. त्यामध्ये माजी खासदारांचाही समावेश आहे. तर बापट यांच्या सूनेच्या नावाचीही चर्चा आहे. तर काॅंग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काॅंग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय ? सर्वांच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
पुणे लोकसभेची पोटनिवडणुक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. काॅंग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिध्दार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिका आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
दरम्यान, पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे चार दिवस झाले आहेत. त्याआधीच पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्या निमित्ताने शहरभर बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र कल्याणी नगर भागात लागलेल्या एका बॅनरवर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
Read also
हेही वाचा…आता कुणालाही सोडणार नाही, माझं गृहमंत्रीपद अनेकांना खुपतं ;” देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित