मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असा टोला सुप्रिया सुळे यांना टोला हाणला आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान
संजय राऊतांना राज्य सरकारने तातडीने झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे. अशी माझी सरकारकडे आग्रहाची विनंती आहे. संजय राऊत यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अशी कुणाची हिमंत होते. ? असा संप्तत सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. संजय राऊतांना अशा पद्धतीने धमकी येणं है दुर्दैव आहे. परंतु अशी हिमंतच कुणामध्ये होते. या मध्ये गृहमंत्र्यांचं अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या
मी गृहमंत्री झाल्यानंतर अनेकांना त्याची अडचण झाली आहे. त्याच्यामुळे अनेकांना असं वाटतंय की मी गृहमंत्रीपद राहिलो नाही पाहिजे. मी गृहमंत्री म्हणून राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो चार्ज दिला आहे आणि जे जे चुकीचे काम करतील, त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तसेच गृहमंत्री म्हणून मी या आधीपण पाच वर्ष काम केलं आहे आणि जे चुकीचं काम करत आहेत. त्यांना मी सोडणार नाही. असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
दरम्यान, पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे दोन जण पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच पार्श्भूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स