नाशिक : अलिकडेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा झाली. नाशिकच्या मालेगाव येथील शिवसेना उद्धव ठाकरे उपनेते अद्वव्य हिरे यांच्यासह ३२ जणांवर फसवणुक करून दिशाभूल केल्याप्रकरणी सटाणा व मालेगावच्या आयोशा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आहे. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा असतानाच फसवणुक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते.
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
त्या अगोदर नाशिकच्या सटाणा पोलीस स्थानकात अद्धव हिरे व त्याच्या काही सहकाऱ्यांच्या विरोधात सटाणा पोलीसात तक्रार दाखल झाली. दुसऱ्याच दिवशी फसवणुक झालेल्या लोकांनी महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलने केले होते. दुपारनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वाशन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांन आपले आंदोलन मागे घेतले होते. हिरे यांच्या रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर ३२ कोटींची थकबाकी असताना बॅंकेची दिशाभूल केल्याप्रकरणी आयोशानगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी न सोडतांना दिसत आहे. यातच आता ठाकरे गटातील नेत्यांवर सत्ताधारी पक्षातील नेते निशाणा साधत आहेत.
Read also
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल