मुंबई : खासदार संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर राज्यात दंगली होणं ही खुप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना लगावला आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गृहमंत्री जेलमध्येच सडला तेव्हा कुठे गेली होती पोटदुखी? तुमच्या काळात शेकडो पोलिसांवर हल्ले झाले. निष्पाप सांधूची हत्या केलीत. कोणी विरोधात बोललं तर त्याला सरळ कोललं असा होता तुमचा न्याय. तेव्हा का नाही केलंत हे नाटक ? असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. नजर सुधारा जरा स्वत: ची ताई असंही म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिसा सुळे यांना डिवचलं आहे.
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, अमरावती नांदेडमध्ये दंगली उसळल्या तेव्हा मागायचा ना राजीनामा. तसंही आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे धकधक वाढली असेल त्याच अॅसिडिटीमुळे ही मळमळ होत आहे. हेही सगळ्यांच्या लक्षात येतंय पैशाचा लेप लावून झाकलेली तुमची प्रकरण आता पार उघडी पाडणारा आलाय याची धाकधुक जाणवतेय. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काय राज्याच्या मोठ्ठ्या ताई….
हेच कामधंदे उरलेत का आता???नजर सुधारा जरा स्वतःची..
मविआचा गृहमंत्रीच जेलमध्ये सडला तेव्हा कुठे गेली होती ही पोटदुखी..?तुमच्या काळात शेकडो पोलिसांवर हल्ले झाले निष्पाप साधूंची हत्या केलीत कोणी विरोधात बोललं तर त्याला सरळ कोललं असा होता तुमचा… pic.twitter.com/MzG4tfOLil
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 1, 2023
Read also
हेही वाचा…“दोन दिग्गज आले, म्हणजे चर्चा तर होणारच,” शरद पवार नितीन गडकरींच्या भेटीला
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज
हेही वाचा…“शिवसेना गटाचे नेते अद्वय हिरेंसह ३० जणांवर फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल,” मालेगावची सभा झाली अन्…
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल