मुंबई: दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न सत्यात उतरवणार आहे, यावर्षी महाडा ९ हजार घरांची लॅाटरी काढणार आहे. म्हाडाचे कोकण मंडळाकडून याबाबतची जाहिरातदेखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांच्या लॉटरीची सोडत काढली जाणार आहे.
हे पण वाचा: चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंग यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका
लॉटरीमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६५०० घरं आणि कोकण मंडळ आवास परियोजनेंतर्गत २००० आणि २० टक्के योजनेंतर्गत ५०० घरांचा समावेश आहे.
हे पण वाचा: “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोरोना या प्रमुख कारणांसह उर्वरित कारणांमुळे दोन्ही मंडळांची घराची लॉटरी निघत नव्हती. त्यातल्या त्यात कोकण मंडळाकडून घराच्या लॉटरीची आशा होती. मात्र, अनेक दिवस याबाबत हालचाली होत नव्हत्या. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे चित्र होते. मात्र, आता म्हाडाने सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा: झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हाडाचे कोकण मंडळ ९००० घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ही घरं निम्न आणि मध्यम वर्गीयांच्या आवाक्यातील असतील. ठाणे, मीरा रोड, वर्तकनगर, विरार बोळिंज नाका, कल्याण, वडवली आणि ठाण्याच्या गोथेघरमध्ये ही घरं उपलब्ध होणार आहेत. मीरा रोडमध्ये मध्यम वर्गीयांसाठी २ बीएचके १९६ घरं आहेत. ठाण्यातील वर्तकनगरमध्ये ६७ दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यांची किंमत जवळपास ३८ लाख ते ४० लाखांच्या घरात असतील.
Read Also :
- “शिवसेनेत नाकारल म्हणून बेताल वक्तव्य ,” चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर
- मराठा आरक्षण: ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ अशोक चव्हाण म्हणतात….
- ब्रेकिंग! १०२ व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार आता राज्यांना मिळणार
- ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला
- राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर बघून, आख्खी भाजप कामाला लागली; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका