मुंबई : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सापडलेल्या, राज्यातील पहिल्या ‘झिका’ विषाणूच्या रुग्णाला भेटायला केंद्रीय पथक जाणार असून, त्यांच्याकडून तपासणी केल्यावर राज्य सरकारला याबाबतच्या सूचना दिल्या जातील, पण राज्यात ‘झिका’ विषाणूचा फैलाव झाला नसून, राज्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही,” असं आश्वासक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
“MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा”, मागणी घेऊन ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपाल दरबारी
राज्यात पुरंदरमध्ये ‘झिका’चा रुग्ण सापडल्याने, राज्यभरात खळबळ उडाली. त्यामुळे कोरोना, म्युकरमायकोसीस यांच्या पाठोपाठ आता ‘झिका’चेही संकट राज्यासमोर उभे ठाकले असल्याची चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर, टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत, “विषाणूला घाबरून न जाता, स्वतःची काळजी घेण्याची, पावसाचं पाणी साठू न देणे, भांड्यात साठवलेलं पाणी वेळोवेळी बदलणे, भांडी कोरडी ठेवणे आणि घराच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे”, अशा सूचना केल्या आहेत.
अखेर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर, पुणेकरांना दिलासा नाहीच
तसेच, प.महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. त्यामुळे, अधिकाधिक लसी या जिल्ह्यांत पाठवण्यात येतील”, अशी माहिती देत, “केंद्राकडून लसी उपलब्ध होत नसून, याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. पुरवठा वाढावा यासाठी केंद्राला पत्र लिहिलं आहे,’ असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, ११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, तर मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांसोबत इतर २२ जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, याचा नवीन अध्यादेश सरकारने १ ऑगस्टपासून राज्यात लागू केला आहे.
Read Also :
- “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
- चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंग यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका
- पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
- जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
- ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं