पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असल्याने विविध आशयाचे मजकूर असलेले होर्डिंग लावण्यात आले होते. त्या होर्डिंग्सची चर्चा शहरात थांबत नाही तोवर आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेही यामध्ये उडी घेतली आहे. उद्धव ठाकरेंचा २७ जुलैला वाढदिवस असल्याने पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार असे होर्डिंग शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत.
महापालिका रणधुमाळी : भाजपची पुण्यनगरी कोणाकडे? नेतृत्वाच्या संभ्रमात कार्यकर्ते नाराज
या होर्डिंगमुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजपा आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे. तसंच यामुळे पुण्याचा विकास कोण करत आहे यावरुन आरोप प्रत्यारोपदेखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा होर्डींग युद्ध पेटण्याची शक्यता आहे. शिवाय, पुण्याचा खरा विकासपुरूष कोण?, खरा शिल्पकार कोण?, असे प्रश्न सुरूच आहेत.
पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
राज्यातील महापालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचे नेते, कार्यकर्ते सोशल मीडियावर तसंच चौकाचौकात होर्डिंग लावून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याबाबत सांगायचे झाल्यास, २२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते अजित पवार आणि भाजपाचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर होर्डिंग लावण्यात आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून कारभारी लयभारी, कर्तव्य प्रतिदक्ष प्रत्येक कामावर जातीने लक्ष, पुण्यनगरीचा विश्वास दादा म्हणजेच विकास तर भाजपाकडून विकास पुरुष असे होर्डिंग लावण्यात आले होते. या दोन्ही होर्डिंगची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातच आता शिवसेनेने उडी घातल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच
दरम्यान, “कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. “वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्स लावू नये. सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू,” असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Read Also :
- पुणे महानगर नियोजन समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय