मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत मंत्रालयातील कामकाज बंद पाडलं आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी या आमदारांकडून करण्यात येत आहे. यातच आता जवळपास दीड तासानंतर पोलिसांनी सर्व पक्षीय आमदारांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा…“शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी”, मराठा आरक्षणाला अजून वेळ लागणार ?
आज सकाळपासून सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. मंत्रालयाला टाळ ठोकून आमदारांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी या आमदारांकडून करण्यात आली.
हेही वाचा…“घर जळत होतं, तेव्हा मुल देवा घरात हात जोडून होती,” क्षीरसागर कुटुंबीयांनी सांगितला धक्कादायक अनुभव
दरम्यान, जवळपास दीड तासानंतर पोलिसांनी सर्व पक्षीय आमदारांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. तसेच आमदारांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना अज्ञात स्थळी नेणण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षण मोडून काढण्याचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचा डाव,” जरांगे पाटलांनी व्यक्त केली शंका
हेही वाचा…“पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा”
हेही वाचा…पुण्यातील आंदोलनप्रकरणी आतापर्यंत ४०० जणांवर गुन्हे दाखल, तर १२ हजार २९४ कुणबी प्रमाणपत्राचं वाटप
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू
हेही वाचा…बीडच्या घटनेत ३४ आरोपींना अटक..! “तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा