मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी या आंदोलनाला सुरूवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु ठाकरे गटातील शिष्टामंडळ पोलिसांच्या भेटीला गेल्यानंतर मोर्चा मार्ग बदलवून परवानगी दिली आहे. यावरून आता ठाकरे गटाकडून भ्रष्टाचाराची यादी वाचून सांगितली आहे.
हेही वाचा…पुण्यात दिवसा ढवळ्या तरूणीवर कोयत्याने हल्ला..! “गृहमंत्र्यांनाही बहुथा राजकीय..,” अजित पवारांचा घटनेवर संताप
मुंबईतल्या रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट फर्निचरसाठी काढण्यात आलेले २६० कोटींचे टेंडर म्हणजे, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदार मित्रांसाठी काढलेले टेंडर. असं ट्विट शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आला आहे. तसेच एकाच पुरवठादाराकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करताना सूट मिळण्याएवजी वाटाघाटांशिवाय वस्तूंची किमंत मात्र वाढवली गेली आहे. ह्या टेंडर अंतर्गत अंदाजे ४०, ००० स्ट्रीट बेंच आणि कुंड्यांची खरेदी करण्यात येणार असून, ते नेमके कुठे लावण्यात असून, ते नेमके कुठे लावण्यात येणार? असा सवालही करण्यात आला आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा एक आदेश अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ‘१८’ नगरसेवक ‘सहा’ वर्षासाठी निलंबित
दरम्यान, महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचारांचं हिदूत्ववादी सरकार स्थापन झालं आहे. आत्तापर्यंत थांबलेली आणि थांबवलेली विकासकामं मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत. मुंबई ज्यांनी १५ वर्षे ओरबाडली, मुंबईची लूट केली ते आता हिशोब द्यायची वेळ आल्यावर मोर्चे काढत आहेत. असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
मुंबईतल्या रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट फर्निचरसाठी काढण्यात आलेले २६० कोटींचे टेंडर म्हणजे, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदार मित्रांसाठी काढलेले टेंडर!
काय आहे नेमका मुंबई स्ट्रीट फर्निचर घोटाळा? pic.twitter.com/ccQRTOPkDa
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांनी १५ वर्षे मुंबई महापालिका ओरबडली, तेच आता….”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“..तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”
हेही वाचा…“कालच्या प्रकरणावरून शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरूवात केली”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स…! ‘या’ प्रकरणात १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश