मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून मौन धारण करून बसले आहेत. मात्र भाजपला धक्का देण्याची त्यांची वृत्ती अजूनही गेलेली नाही हे मात्र आता पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. संजय राऊत यांनी भाजपमध्ये नाराज असण्याऱ्या नेत्यांची भेट घेऊन त्यांची मोट बांधण्याची तयारी सुरु केली आहे.
एकट्या राहुला गांधीना दोष देणं शक्य नाही; पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे : सुशिल कुमार शिंदे
भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. वरुण गांधी हे मागील काही दिवसांपासून भाजप नेतृत्वावर नाराज आहेत आणि पाक नेतृत्वावर थेट टीका करत आहेत. त्यामुळे भाजपकडूनही त्यांना वारंवार डावलले जात आहे. याच पार्शवभूमीवर संजय राज्य राऊत यांनी वरुण गांधी यांची भेट घेतली आहे.
कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
या भेटीनंतर राजकारणात उलट-सुलट चर्चा होत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ही भेट काही राजकीय नव्हती. मात्र या भेटीत राजकीय चर्चा नक्कीच झाली असं राऊतांनी म्हटलं आहे. वरुण गांधी हे एका राजकीय पक्षाचे नेते असले, खासदार असले आणि गांधी कुटुंबाशी संबंधित असले तरी ही भेट सदिच्छा भेट होती. यापुढे देखील गांधी कुटुंबियांसोबत आमची भेट सुरु राहील. कोणत्याही भेटीत राजकीय विषय हे निघतच असतात तसंच या भेटीतही होत राहील. वरुण गांधी हे उत्तम लेखक आहेत. ते छान लिखाण करत असतात आणि अनेक विषयावर ते चांगल्या गप्पा मारतात.
कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड
उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी विशिष्ट भूमिका घेतली होती. त्याबद्दल त्यांचे आभार यावेळी मी व्यक्त केले आहेत. वरुण गांधी आणि त्यांच्या कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते. या पुढेही आम्ही भेटण्याचं ठरवलं आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- तुम्ही शिवसेना नाही, सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न करू नका; तानाजी सावंतला अंधळकरांनी धो धो धुतलं
- आघाडीत शिवसेना पाठोपाठ काॅंग्रेसही नाराज; काॅंग्रेसचे 25 आमदार सोनिया गांधींची घेणार भेट
- काँग्रेस बाप आहे हे फार उशिरा कळले ? महापौर संदीप जोशींचे नानांना शाब्दिक टोले
- अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात
- फडणवीसांना भावी मुख्यमंत्री म्हणत, भाजप आमदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप