मुंबई : मागील काही दिवसापासून अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दिपीका पदुकोणचा पठाण चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. असे असताना देखील पठाण हा चित्रपट काल संपुर्ण भारतात प्रदर्शित झाला. परंतु मराठी चित्रपट थेटर मध्ये चालत असताना त्यांना पठाणमुळे थेटर मिळत नसल्याचं मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले. तर मराठी चित्रपटांना डावलून पठाण चित्रपट चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक
पठाण हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. पठाण या चित्रपटाला आमचा विरोध नाही, लोकांनी हा चित्रपट बघावा. परंतु मराठीतील वेड हा चित्रपट मागील चार आठवड्यापासून चांगला चालत आहे. त्यानंतर वाळवी, बांबू, असे अनेक मराठी चित्रपट चालत आहेत. परंतु यांना थेटर मिळत नाहीत. त्यामुळे यांना थेटर उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा पठाण हा चित्रपट आम्ही चालू देणार नाही. असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे.
मुलायम सिंह यादव, झाकीर हुसेन, सुधा मुर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार…! वाचा संपुर्ण यादी
यावरून खोपकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला आहे. हर हर महादेव वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? असा सवाल खोपकर यांनी केलाय. तर पठाण मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसतांना आव्हाड मुंब्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत? असा टोलाही त्यांनी लगावला.
“फडणवीस साहेब…..! आमच्या पुण्याकडेही लक्ष्य द्या”, सुप्रिया सुळे
दरम्यान, हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी थेटरमध्ये जाऊन हर हर महादेव चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करत चित्रपटाचे स्क्रिन बंद पाडले होते. त्यावरून आता मनसेनेही त्यांना सवाल केले आहेत.
‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2023
Read also
- शिंदे गटाने नवस केलेल्या कामाख्या देवीचा चित्ररथ कर्तव्यपथावर, अनेकांच्या नजरा
- “संविधानाच्या तत्त्वांना सत्ताधारी पक्षांकडून हादरे देण्याचा प्रयत्न,” राष्ट्रवादीचा निशाणा
- “कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस
- शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगरांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिलाय का?” राष्ट्रवादीचा संतप्त सवाल