दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व विविध राज्य सरकारे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. पण सध्या राजकीयदृष्ट्या देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपमधील अनेक मंत्री,आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनागथ यांच्या कडक कार्यशैलीमुळे नाराज असल्याच्या बातम्या मागच्या काळात आल्या होत्या. पण आता याची तिव्रता इतकी वाढलीये की थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांंना यात वैयक्तिक पातळीवर लक्ष द्यावे लागत आहे.
तर झाले असे देशात कोरोना महामारीचा सामना करण्यात उत्तर प्रदेश सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून राज्यात अनेक ठिकाणी गंगा आणि यमुना नदीत असंख्य प्रेतं सापडली आहेत. यामुळे योगी सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
परंतु योगी सरकारच्या एककल्ली निर्णयप्रक्रियेमुळे आणि कोरोना हाताळणीत आलेल्या भयंकर अपयशामुळे पंतप्रधान मोदी ब्रँडच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे मोदी-शाह जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत योगींना शह देऊन नेतृत्वबदल करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती अनेक प्रसारमाध्यमे व विश्वसनीय सुत्रांकडून येत आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लखनौमध्ये होणाऱ्या हायलेवल आणि वारंवार होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका काही तरी घडणार आहे हे प्रतीत करते.
पक्षांतर्गत संघर्ष!
यूपी भाजपमधील बिगरयोगी गटात मोठा राजकीय संघर्ष आहे. मुळात जेव्हा 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी योगींना झुकते माप देऊन केशवप्रसाद मौर्य,मनोज सिन्हा आणि दिनेश शर्मा अशा मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असलेल्या नेत्यांची निराशा केली होती. त्यामुळे तेव्हापासून या वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी गट सक्रिय आहेत. आता भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे भाजपने डँमेज कंट्रोल करण्याच्या दृष्टीने जोरदार पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री योगी सुप्तसंघर्ष!
मोदींनी त्यांचे निकटवर्तीय असलेले अरविंद शर्मा यांना उत्तर प्रदेश विधानपरिषदेत पाठवून मुख्यमंत्री योगींच्या वाढत्या प्रभावाला कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांना कँबिनेट मंत्री करून लाभाचे आणि महत्त्वाचे खाते देण्याची योजना होती. परंतु याला योगींना फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मोदींचे निकटवर्तीय असलेल्या अरविंद शर्मांना डावलून योगींनी मोदींना आव्हान दिले आहे, असं जाणकारांचं मत आहे.
त्यामुळे आता अशा वेळी भाजप नेमकी काय भूमिका घेणार? अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यमंत्री योगींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगींची खुर्ची जाणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तर प्रदेश मध्ये राजकीय हालचालींवर समाजमाध्यमे व विरोधी पक्षांचे लक्ष असेल!
Read Also :
- महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
- १६ जुनला पहिला मराठा मोर्चा काढणार; संभाजीराजेंची रायगडावरून घोषणा
- ज्यांना काम नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर पलटणार
- मी बोलल्यानंतरच एवढा गोंधळ कशाला; वडेट्टीवार यांनी केली नाराजी व्यक्त
- ‘नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलतात; तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही’
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’