मुंबई : शिवसेनेचा 19 जून रोजी 57 वा वर्धापन दिन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला. या वर्धापन दिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार पलटवार केला आहे. यावर आता शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले, असून एकमेकांवर जोरदार टीका टीप्पणी सुरू आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे.
हेही वाचा…“अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते,.. ” फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित आणि अमित शहा यांना हिटलर अफजलखान असं म्हणत किती शिव्या दिल्या असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते कुठे आणि तुम्ही कुठे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सगळ्या राज्यांनी या अगोदर पाहिलं आहे. जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा मोदी साहेबांना भेटायला गेले होते. असा घणाघात देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरती लगावला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केलाय. उद्धव ठाकरे म्हणाले की मिंधे सातत्याने दिल्लीला का जात आहेत. त्यांना एक ईडीची नोटीस आली की ते लगचे दिल्लीला जात आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…शिंदे गटात गेलेल्या आमदार ‘मनिषा कायंदें’वर अपात्रतेची टांगती तलवार, अपात्रतेची कारवाई होणार ?
एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी देखील पलटवार केलाय. एकनाथ शिंदे यांना ईडीने फक्त डोळे वटारले तरी ते पळून दिल्लीला जाताहेत. त्यानंतर त्यांनी पक्षांतर केले. त्यांच्याकडील दोन माणसांना फक्त उचलून घेऊन गेले. त्यानंतरची संपूर्ण कथा महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळेच आजचा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करा, असं मी वारंवार म्हणतोय. आम्हाला देखील नोटीस आल्या, परंतु आम्ही कोणालाही न घाबरता तुरुंगात गेलो, परंतु आम्ही गद्दारी केली नाही. ज्यांना गद्दारी करायची होती. त्यांनी केली परंतु आम्ही आमचा पक्ष सोडला नाही, असं देखील संजय राऊत आणि म्हटले. तर एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय सचीन जोशीला इडीने का उचललं होतं? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायची हिमंत आमच्यात, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर आम्हाला जेलमध्ये टाकावं”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…“जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणार”, राज्यातील बड्या नेत्याचं सुचक विधान
हेही वाचा…मुंबई महानगरपालिकांसाठी ठाकरेंची रणनीती, माजी नगरसेवकांची बोलवली तातडीची बैठक
हेही वाचा…“उमेदवारी दिली नाही तर…” भाजप मावळ निवडणुक प्रमुख रवी भेगडेंचं सुचक विधान
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ‘या’ स्टॅंप घेऊन आम्ही पण तयार आहोत”, मुंबईच्या भ्रष्टाचारावरून भाजप आक्रमक