मुंबई :-आगामी लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील राजकीय गणित बदलले आहेत. त्यामुळे आता राजकीय नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये जातील, असा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा…शिंदे गटात गेलेल्या आमदार ‘मनिषा कायंदें’वर अपात्रतेची टांगती तलवार, अपात्रतेची कारवाई होणार ?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील रडत होते. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु जयंत पाटील का रडत होते असा अहवाल ही संजय शिरसाठ यांनी केलाय त्यांना माहिती आहे की ज्या जोपर्यंत शरद पवार यांचं छत्र माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी राष्ट्रवादी पक्षात आहे त्यामुळे काही दिवसात जयंत पाटील यांना भाजपच्या रस्त्यावर जावंच लागणार आहे आणि ते जाणारच हे निश्चित आहे असा दावा देखील संजय शिरसाठ यांनी केलाय.
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ तर ठाकरेंकडून ‘खोके दिवस’ साजरा, शिंदे ‘असं’ देणार प्रत्युत्तर
दरम्यान , अलीकडेच शरद पवार यांनी राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता बघायला मिळाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेण्यात घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते. तर एका जाहीर कार्यक्रमात जयंत पाटील यांना अश्रु अनावर झाले होते. यातच या पार्श्वभूमीवर संजय शिरसाठ यांनी जयंत पाटील यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. आता यावर जयंत पाटील काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सगळं पितळ उघडं करणार, शिवसेनेचा १ जुलैला विराट मोर्चा” उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
हेही वाचा…मुंबई महानगरपालिकांसाठी ठाकरेंची रणनीती, माजी नगरसेवकांची बोलवली तातडीची बैठक
हेही वाचा…“उमेदवारी दिली नाही तर…” भाजप मावळ निवडणुक प्रमुख रवी भेगडेंचं सुचक विधान
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ‘या’ स्टॅंप घेऊन आम्ही पण तयार आहोत”, मुंबईच्या भ्रष्टाचारावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…“अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते,.. ” फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पलटवार