मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यात सुरूवात केली आहे. यातच काल शिवसेनेचा वर्धापन दिवस दोन्ही गटाने साजरा केला. तर आज मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. यातच आता १ जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ तर ठाकरेंकडून ‘खोके दिवस’ साजरा, शिंदे ‘असं’ देणार प्रत्युत्तर
गद्दार शेवटी गद्दारच राहणार आहे. असंतोषाला वाचा फोडायला काही कृती करू नका. कारण लोकांच्या मनात असंतोष धुमसतोय आणि याने किती काही म्हटलं तर यांच्या कपाळावरील गद्दार हा शिक्का कधी पुसला जाणार नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार”, निलेश लंकेंनी भाजपच्या मंत्र्यांला डिवचलं
एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांवर आरोप केले जातात परंतु त्यांची कुठलीही चौकशी केली जात नाही रोज त्यांच्या बाबत प्रकरणाबाबत क्लिनचीट निघत आहेत. परंतु या क्लीन चिता आमचं सरकार आल्यानंतर परत काढून आणि त्या क्लीनचिटा त्यांना कशी दिल्या कोणी दिल्या हे सगळं बाहेर काढू, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलाय.
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
दरम्यान, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा भाजपचा बेसूर चेहरा आम्ही समोर आणला आहे. सातत्याने रस्त्यांमध्ये घोटाळा झाला आहे. खडी मध्ये घोटाळा झालाय तसेच इतर प्रकरण इतर गोष्टींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय आणि त्याचंच मोठं स्वरूप हा एक मोर्चा असणार आहे. असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांना रोज नोटीसा येत असतील, त्यामुळे ते दिल्लीला सातत्याने जात आहे असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबई महानगरपालिकांसाठी ठाकरेंची रणनीती, माजी नगरसेवकांची बोलवली तातडीची बैठक
हेही वाचा…“उमेदवारी दिली नाही तर…” भाजप मावळ निवडणुक प्रमुख रवी भेगडेंचं सुचक विधान
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ‘या’ स्टॅंप घेऊन आम्ही पण तयार आहोत”, मुंबईच्या भ्रष्टाचारावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…“अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते,.. ” फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पलटवार
हेही वाचा…शिंदे गटात गेलेल्या आमदार ‘मनिषा कायंदें’वर अपात्रतेची टांगती तलवार, अपात्रतेची कारवाई होणार ?