पुणे : आगामी लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यातच लोकसभा आणि विधानसभा या मतदार संघासाठी भाजपने विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यातच आता भापजने मावळ मतदारसंघ याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. या मतदारसंघाची जबाबदारी रवी अप्पा भेगडे यांच्याकडे भाजपने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जर भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं नाही तर रवी अप्पा भेगडेकाय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका अध्यक्ष आणि निवडणुक प्रमुख, रवी अप्पा बेगडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्रिमंडळातील ‘५’ मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”
मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचा दबदबा आहे. सुनील शेळके हे सुरुवातीला भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते आमदार झाले. आता भाजप पुढे सुनील आण्णा शेळके यांचंच आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
रवी भेगडे म्हणाले की, निवडणूक लढवण्याची प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि त्याप्रमाणे तो कार्यकर्ता पक्षासाठी काम करत असतो. त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवारी मागणं हे आपलं काम असतं. जर पक्षाने त्याला उमेदवारी दिली तर त्यासाठी काम करणं आणि जरी नाही दिली तरी दुसऱ्या उमेदवारासाठी काम करणं. हेच आपल्या पक्षाचं धोरण राहिलं आहे.
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”
तसेच उमेदवाराला निवडून आणणे हे जनतेच्या हातात असतं. त्यामुळे प्रत्येक निवडणूक निवडणुकीची गणित आहेत .त्या त्या वेळी परिस्थितीनुसार काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे माझ्याकडे पक्षाने जी जबाबदारी दिली आहे. मग ते विधानसभा असेल लोकसभा असेल आणि महानगरपालिकांसाठी पोषक वातावरण तयार करणे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी जे जे आम्हाला करावे लागेल तेथे आम्हाला करायचं आहे असे रवी भेगडे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ‘या’ स्टॅंप घेऊन आम्ही पण तयार आहोत”, मुंबईच्या भ्रष्टाचारावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…“अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते,.. ” फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पलटवार
हेही वाचा…शिंदे गटात गेलेल्या आमदार ‘मनिषा कायंदें’वर अपात्रतेची टांगती तलवार, अपात्रतेची कारवाई होणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ तर ठाकरेंकडून ‘खोके दिवस’ साजरा, शिंदे ‘असं’ देणार प्रत्युत्तर
हेही वाचा…“तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार”, निलेश लंकेंनी भाजपच्या मंत्र्यांला डिवचलं