मुंबई : भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला जातो. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना पक्षातील पदे सोडावी लागणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र, आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागू शकते.
“उशीरा का होईना, पण शपथविधी झाला”; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोमणा
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वांचे लक्ष खाते वाटपाकडे असून, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत होणार आहे. तसेच पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीचे वाटप देखील करण्यात येणार आहे. कारण 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडावंदन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे राज्यातील किमान 18 जिल्ह्याच्या ठिकाणी तरी पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा वंदन होण्यासाठी तातडीने पालकमंत्री व खातेवाटप होईल, असे सांगण्यात येत आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात 18 मंत्र्यानी शपथ घेतली मात्र यामध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर जोरदार टिका केली आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे, तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही महाविकास आघाडीचं सरकारने पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा 5 मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही. असंही ते म्हणाले.
ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय नेते तयारी करताना दिसत आहेत. यातच आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महाराष्ट्रा राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्टपासून घेण्याचं ठरवलं आहे. त्याआधीच उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
Read also
- “भाजपमध्ये जाताच बाकीच्या नेत्यांना गंगेमध्ये धुऊन पवित्र केलं”
- “ज्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्यांना “अच्छे दिवस” आले असल्याचं समजावं”
- शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’
- “एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली”
- “भाजपला ‘गॅंग ऑफ वासेपुर’ ही उपमा देणारे महोदय आता भाजपमध्ये विसावलेय”