नागपूर: सध्या नागपुरात काँग्रेस आणि भाजपचा बॅनर वॉर सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरीश पांडव यांच्या वाढदिवसाचे बॅनर महापालिकेने काढले. त्याविरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविलं.
हे पण वाचा: पेगासस प्रकरणावरून भाजप विरोधात दिल्लीत एकवटले, महाविकास आघाडीसह सगळे विरोधक
नागपूर महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडूनही पूर्ण तयारी केली जात आहे, तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील निवडणुकीसाठी चांगलेच सक्रीय झाले आहेत. सध्या शहरात काँग्रेस आणि भाजपचे झेंड आणि बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. विशेषतः युवक काँग्रेसकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.
हे पण वाचा: प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई होणार? उच्च न्यायालयाने दिले ईडीला आदेश
त्यातच काँग्रेसकडून प्रदेश सरचिणीस गिरीश पांडव यांच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात लावण्यात आले. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने गिरीश पांडव यांच्या वाढदिवसाचे बॅनर काढले. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन करत रोष व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविलं.
हे पण वाचा: “आता देशाला ‘सच्चे दिन’ दाखवण्याची गरज, सर्व विरोधक एकत्र आले तर ६ महिन्यातच परिणाम दिसतील”
दरम्यान, त्याचठिकाणी लागलेले भाजपचे बॅनर काढले नाही आणि काँग्रेसचे बॅनर हटविण्यात आले. याबाबत त्यांना विचारले असता हे प्लॅस्टीकचे बॅनर असल्याचे महापालिका आयुक्त म्हणाले. महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी हे भाजपचे प्रचारक आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
कॅम्प का असावं याची कारणमिमांसाही आदिती तटकरे यांनी केली आहे.
Read Also :
- पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, १२ ठिकाणांवर सीबीआयने जलदगतीने टाकले छापे
- राज्य सरकारकडून १४ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरु
- भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु
- “फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”