नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती दडवल्याचा दावा अॅंड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणी आज शुक्रवार नागपूर कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणात आता कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांची निर्दोष मुक्तता केली असल्याचं फडणवीस यांच्या वकिलांनी आज पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितलं आहे.
हेही वाचा…“खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्येही सुरू,” वडेट्टीवारांचा ट्रीपल इंजिन सरकारवर हल्लाबोल
2014 च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर अनेकदा कोर्टात सुनावणी झाली. परंतु यावर कोर्टाने कोणताही निर्णय दिलेला नव्हता. आज कोर्टात या प्रकरणात सुनावणी पार पडली. यावेळी फडणवीसांनी ऑनलाईनच्या सुनावणीसाठी हजेरी लावली. दोन्ही गुन्ह्यांची माहिती कोर्टाने घेऊन साक्षीदार आणि समोरील बाजू ऐकून कोर्टाने फडणवीसांच्या बाजूने निर्णय दिला.
हेही वाचा…“धनगर आरक्षण तापलं, आंदोलनकांनी मंत्र्यांवर भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण”
दरम्यान, या प्रकरणाबाबत कोर्टाने निरिक्षण नोंदवतांना १२५ ए अंतर्गत लोकप्रतिनिधीच्या कायद्याच्या अंतर्गत ज्या गोष्टी आरोप सिद्ध करण्यासाठी महत्वाच्या असतात. त्या याप्रकरणात दिसून आल्या नाहीत. असंही देवेंद्र फडणवीसांच्या वकिलांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही भाजपला निवडणुक कठीण जाईल”
हेही वाचा…“सरकारचं आमच्यावर लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळवून द्या,” बांधावरच शेतकऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
हेही वाचा…“लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका”, भाजप आमदाराचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, विखे पाटील म्हणाले, “भंडारा उधळणाऱ्यांवर.., “
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून खाली उतरवलं, अन् हातपाय तोडण्याची दिली धमकी