पुणे : पित्ताचा जास्तच त्रास जाणवू लागल्याने सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. काल तब्बल १७ तास अजित पवार नॉटरिचेबल असल्याने अजित पवार पुन्हा बंड करण्याच्या तयारीत आहेत का ? अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“तुम्ही २ आत टाकले अजून २० तयार होतील, लक्ष्यात ठेवा,” जितेंद्र आव्हाडांनी दिला राज्य सरकारला कडक इशारा
अजित पवार आपल्या सात आमदारांसह कालपासून नॉटिरिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्यावर बोलतांना मिटकरी म्हणाले की, स्वप्नात मांडे मोडणाऱ्या भाजपच्या काही फडतूस लोकांनी त्यांच्या सोशल मीडियावरून अजितदादांचे कार्यक्रम रद्द झाल्याबरोबर रात्रभर आसूरी आनंद घेतला असला तर एक कबुल केले की दादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते आहेत. दादांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. काळजी नसावी.
हेही वाचा…“जर आपला देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा देखील पाकिस्तान होईल”
काल अजित पवार आपल्या सात आमदारांना घेऊन गायब झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. तब्बल १७ तासानंतर अजित पवारांनी आज सकाळी खराडी भागात एका ज्वेलरी शोरूमचं उद्घाटन केल्यानंतर अनेकांनी सुस्कारा सोडला. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीसह शोरूममधील दागिण्यांची पाहणी केली.
हेही वाचा…“पुणे लोकसभा पोटनिवडणुकीकरीता मी देखील इच्छुक, पक्षाने जबाबदारी दिली तर,…” संजय काकडेंची प्रतिक्रिया
दरम्यान, काल अजित पवार यांनी पुण्यातील सगळेच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले होते. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, मला पित्ताचा त्रास झाल्याने आराम करत होतो. मीडियाने माझा बदनामी करण्याचं थांबवलं पाहिजे. कारण नसतांना किंवा कोणतीही माहिती असल्याशिवाय दाखवत जाऊ नका, आता उरर्वित कार्यक्रम पुढचे करणार असून पुढे सातारा दौऱ्यावर देखील जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
स्वप्नात मांडे मोडणाऱ्या भाजपच्या काही “फडतूस”लोकांनी त्यांच्या सोशल मीडियावरून अजितदादांचे कार्यक्रम रद्द झाल्याबरोबर रात्रभर आसुरी आनंद घेतला असला तर एक कबुल केले की दादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते आहेत.दादांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरु आहेत काळजी नसावी 😄😆
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 8, 2023
Read also
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय
हेही वाचा…“सध्या कलयुग सुरूअन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर जहरी टिका
हेही वाचा…तब्बल १७ तास नॉटरिचेबल..! बंडाच्या तयारीत ? अजित पवार अवतारले अन् सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी विचार केला तर त्यांना लहान भाऊ म्हणून मोदी माफ करतील”
हेही वाचा…राहुल गांधी, पटोले, खरगेंवरील टिका भोवली, काॅंग्रेसचा मोठा नेता निलंबित, आता राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?