पुणे : राज्यात पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यातच काल जवळपास १७ तास अजित पवार नॉट रिचेबल होते. त्यानंतर अजित पवार पुन्हा बंड करण्याच्या तयारीत आहेत का ? अशी चर्चा रंगली होती. त्यात आज त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…आंबेडकर जयंती अन् महात्मा जोतिबा फुलेंची जंयतीचं राष्ट्रवादीचं कार्यक्रम ठरलं, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना सुचना
काल अजित पवार आपल्या सात आमदारांना घेऊन गायब झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. तब्बल १७ तासानंतर अजित पवारांनी आज सकाळी खराडी भागात एका ज्वेलरी शोरूमचं उद्घाटन केल्यानंतर अनेकांनी सुस्कारा सोडला. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीसह शोरूममधील दागिण्यांची पाहणी केली.
हेही वाचा…अयोध्या भगवामय,, गुवाहाटी झाली, आता अयोध्या, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह आयोध्याला रवाना
यातच काल अजित पवार यांनी पुण्यातील सगळेच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले होते. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, मला पित्ताचा त्रास झाल्याने आराम करत होतो. मीडियाने माझा बदनामी करण्याचं थांबवलं पाहिजे. कारण नसतांना किंवा कोणतीही माहिती असल्याशिवाय दाखवत जाऊ नका, आता उरर्वित कार्यक्रम पुढचे करणार असून पुढे सातारा दौऱ्यावर देखील जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
Read also
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी विचार केला तर त्यांना लहान भाऊ म्हणून मोदी माफ करतील”
हेही वाचा…राहुल गांधी, पटोले, खरगेंवरील टिका भोवली, काॅंग्रेसचा मोठा नेता निलंबित, आता राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?
हेही वाचा…“तुम्ही २ आत टाकले अजून २० तयार होतील, लक्ष्यात ठेवा,” जितेंद्र आव्हाडांनी दिला राज्य सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“जर आपला देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा देखील पाकिस्तान होईल”
हेही वाचा…“पुणे लोकसभा पोटनिवडणुकीकरीता मी देखील इच्छुक, पक्षाने जबाबदारी दिली तर,…” संजय काकडेंची प्रतिक्रिया