ठाणे : महाराष्ट्रात सत्तांतरण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील कामाख्या देवीचं दोनदा दर्शन घेतलं. आपल्या ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी पुन्हा गुवाहाटी गाठलं. यातच आज ठाण्यातील रेल्वे स्टेशनवरून एक विशेष ट्रेन आयोध्याकडे रवाना झाली. त्या ट्रेनमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदार आयोध्यातील राम लल्लाचं दर्शन घेणार आहेत.
हेही वाचा…मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात, विरोधकांची जोरदार टिका
आज ठाणे येथील रेल्वे स्टेशनवरून आपल्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदे आयोध्याला रवाना झाले. उद्या ९ एप्रिल रोजी ते अयोध्येतील हनुमान गढी, राम मंदिर सह, शरयु नदी, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. त्यामुळे सध्या अयोध्यातील वातावरण भगवामय झालेलं दिसून येत आहे. त्याची मोठी तयारी अगोदरच करून ठेवली आहे.
हेही वाचा…“राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक टिका केली आहे. मला पण कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत ते गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत सगळ्या धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या आहेत. पण माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी इतकी जास्त आहे की, ते मला शक्यत होत नाही. पण मला देशातल्या सगळ्या धार्मिक स्थळावर जायला नक्की आवडेल. असं अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…““राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपने मोठी मदत केली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांच्याकडे शिंदेंच्य आयोध्या दौऱ्याची जबाबदारी दिली आहे. यातच आयोध्यात राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची छायाचित्रेही लावण्यात आले आहे.
Read also
हेही वाचा…संदीपान भुमरे म्हणतात, मला दानवेंचं मेंदू घ्यायला आवडेल, त्यावर अंबादास दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले,…
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अन् विकासासाठी भाजपसोबत यावं,” भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांचं आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील
हेही वाचा…“नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या बापाला शोधून काढावं, मग..” मनिषा कायंदेंच्या नवनीत राणांवर हल्लाबोल