पुणे : एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील नेते पक्षांतर करत आहेत. तर ठाकरे गटातील नेत्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षात प्रवेश होत असल्याने वारंवार ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. एकेकाळी शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला असलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता माजी जिल्हाप्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे भाजपात प्रवेश केला आहे. त्यातच आता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. त्यानंतर राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
अमोल मिटकरी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा मागेच सुरू झाल्या आहेत. मात्र त्यावर अमोल कोल्हे यांनी कोणतंही स्पष्टीकरण अद्यापह दिलेलं नाही. यातच एका मुलाखतीत चंद्रकांत पाटलांनी अमोल कोल्हे यांच्या भाजप पक्ष प्रवेक्षावर विधान केलं आहे. २०१९ मध्ये शिरूर लोकसभा येथून आढळराव पाटील निवडणुक लढले. त्यांना अमोल कोल्हे यांनी पाडले. आता समजा अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल. ते विद्यमान खासदार आहेत. त्यानंतर विषय येईल की ते कुणाकडून लढणार? शिंदेकडून की भाजपकडून? मग त्यांना विचारले जाईल. असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज”, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
पुणे जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीला ‘लक्ष्य’ केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आपण शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मतदार संघातील विविध सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ सुरू केला आहे. त्यामुळे खासदार कोल्हे आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे, डॉ. कोल्हे यांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व अलबेल आहे, असे दिसत नाही.
Read also
हेही वाचा…“नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या बापाला शोधून काढावं, मग..” मनिषा कायंदेंच्या नवनीत राणांवर हल्लाबोल
हेही वाचा…मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…“राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा…““राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा..शिरुर लोकसभेत भाजपा सुसाट, महाविकास आघाडी ‘कोमात’