पुणे । विशेष प्रतिनिधी शिरुर लोकसभा मतदार संघातील राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीतील मोठे मासे गळाला लावल्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीची तारांबळ उडलेली असून, २०२४ मध्ये राष्ट्रवादीचा विजय कठीण मानला जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील नेते पक्षांतर करत आहेत. तर ठाकरे गटातील नेत्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षात प्रवेश होत असल्याने वारंवार ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. एकेकाळी शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला असलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता माजी जिल्हाप्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे भाजपात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू, गेल्या तीन महिन्यांपासून…
दरम्यान, राम गावडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपाची शिरूर,आंबेगाव तालुक्यात ताकद वाढली असून, ठाकरे गटाचे नेते भाजपात प्रवेश करतील. त्यामुळे या तीनही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, शिरुर, खेड व पुरंदर तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल अडीचशे ते तीनशे महत्वाच्या पदाधिका-यांनी ठाकरे गटाला पर्यायाने महाविकास आघाडीला रामराम केला आहे. राष्ट्रवादीकडून पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदाचा कार्यकाल गाजविलेल्या आणि उद्धव गटाच्या नेत्या असलेल्या जयश्री पलांडे यांचाही भाजपा प्रवेश झाला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे तर उपस्थित होतेच, शिवाय यातील प्रमुख पदाधिका-यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री अकरा वाजता तासभर दीर्घ चर्चाही केली. त्यामुळे आगामी काळात भाजपा शिरुर मतदार संघात महाविकास आघाडीची कोंडी करणार हे निश्चित आहे.
हेही वाचा…“रॅप साॅंगमध्ये ५० खोक्यांचा उल्लेख, एका तरूणाला अटक, ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा धोकादायक कारभार”
खासदार कोल्हे, राष्ट्रवादीसमोर आव्हान…
पुणे जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीला ‘लक्ष्य’ केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आपण शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मतदार संघातील विविध सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ सुरू केला आहे. त्यामुळे खासदार कोल्हे आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे, डॉ. कोल्हे यांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व अलबेल आहे, असे दिसत नाही.
भाजपाचे मिशन- २०२४….
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने केंद्रीय मंत्री आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांचे शिरुर मतदार संघातील दौरे वाढवले आहेत. पुण्यातील पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण असेल? यापेक्षा ‘कमळ’ चिन्ह घेवून उभा असलेला उमेदवार निवडून येईल, असा दावा भाजपाकडून केला जातो. त्यामुळे भाजपाचे शिरुरमधील मिशन- २०२४ यशस्वी होते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read also
हेही वाचा…“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज”, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दणका..! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
हेही वाचा…“उद्धव ठाकरे तुम्हाला फडतूस म्हणतायत, तुम्ही जर खरचं काडतूस आहात, तर मग एखादी गोळी चालवून दाखवा”, मनसेनचं आवाहन
हेही वाचा..रोशनी शिंदे प्रकरण..! महिला आयोगाने थेट पोलिसांना पाठविली नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश