मुंबई : राज्याचं मागील दोन ते तीन दिवसापासून फडतूस आणि काडतूस या शब्दावरून राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा फडतूस म्हणून उल्लेख केला तर त्याला मी फडतूस नाही काडतूस आहे. असा फलटवार देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच टिका टिप्पणी झाली. यातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा..रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोग पोलिसांच्या अहवालावर असमाधानी
प्रकाश महाजन म्हणाले की, एक उडत उडत आलेली माहिती आहे. ही माहिती खरी आहे की खोटी याबद्दल माझ्या मनात शंका आहे किंवा त्याला भक्कम आधार नाही. परंतु मातोश्री २ बंगल्याचं जे बांधकाम सुरू आहे, त्याच्या एफएसआयवर काही प्रश्न होते. ते देवेंद्र फडणवीसांनी सोडवले होते, तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी फुल होते, ते आता तुमच्यासाठी फडतूस झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगावं ते खरं होतं की खोटं होतं.. तुम्हाला फडतूस म्हणतायत आणि तुम्ही जर खरचं काडतूस आहात तर मग एखादी गोळी चालवून दाखवा. असं आवाहनच प्रकाश महाजन यांनी दिलं.
हेही वाचा…“माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर टिका झाली, परंतु फडणवीस यामुळे व्यथीत होणार नाहीत”, पंकजा मुंडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फेसबुकवर कमेंट् केल्याप्रकरणी शिवसेनेच्या युवा नेत्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यात त्यांना गंभीर मार बसला. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला. याआधी या घटनेचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना फडतूस शब्द वापरला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.
Read also
हेही वाचा..रोशनी शिंदे प्रकरण..! महिला आयोगाने थेट पोलिसांना पाठविली नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
हेही वाचा…अजित पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू, गेल्या तीन महिन्यांपासून…
हेही वाचा…“रॅप साॅंगमध्ये ५० खोक्यांचा उल्लेख, एका तरूणाला अटक, ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा धोकादायक कारभार”
हेही वाचा…“पवार साहेबांनी जेव्हा कृषी विभागाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा देशाला निर्यातीची दारं खुली केली”
हेही वाचा…“कृपया मी जी चिंता करतो, ती गांभीर्याने घ्या,” शरद पवारांचं थेट केंद्र सरकारला “त्याबाबत” पत्र