नवी दिल्ली : शिवसेनेच्या नेत्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी आता राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. काल रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. तर दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियंकी चतुर्वेदी यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. यातच आता खासदार भावना गळवी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची याप्रकरणी भेट घेतली आहे. तर महिला आयोगाने देखील याबाबत पोलिसांना नोटीस पाठविली आहे.
हेही वाचा…“माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर टिका झाली, परंतु फडणवीस यामुळे व्यथीत होणार नाहीत”, पंकजा मुंडे
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलील निरिक्षक यांना या प्रकरणाबाबत नोटीस पाठविली आहे. त्यांना याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, फेसबुक पोस्टवर कमेंट केल्याच्या रामातून रोशनी शिंदे यांना जमावाने मारहाण केल्याची घटना वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित झाली आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
हेही वाचा…रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन महिला खासदार भिडल्या, थेट गृहमंत्र्यांची घेतली भेट
याआधी प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शहा यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणाबाबत भावना गवळी यांनी अमित शहा यांची भेट घेऊन अमित शहा यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून चांगलचं रणकंदन माजलेलं दिसून येत आहे.
हेही वाचा…“सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावला”, दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरे भावूक
यातच रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांना आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोग असमाधानी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज सांयकाळी महिला आयोग आपली भूमिका मांडणार असून त्याबाबत एक पत्रक काढणार आहे. ठाणे पोलिसांना याबाबत आदेश देण्यात आले होते. कासारवडवली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आज आपला अहवाल सादर केला.
रोशनी शिंदे प्रकरणी महिला आयोगाची नोटिस pic.twitter.com/SkpB3gUYr6
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 6, 2023
Read also
हेही वाचा…अजित पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू, गेल्या तीन महिन्यांपासून…
हेही वाचा…“रॅप साॅंगमध्ये ५० खोक्यांचा उल्लेख, एका तरूणाला अटक, ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा धोकादायक कारभार”
हेही वाचा…“पवार साहेबांनी जेव्हा कृषी विभागाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा देशाला निर्यातीची दारं खुली केली”
हेही वाचा…“कृपया मी जी चिंता करतो, ती गांभीर्याने घ्या,” शरद पवारांचं थेट केंद्र सरकारला “त्याबाबत” पत्र
हेही वाचा..रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोग पोलिसांच्या अहवालावर असमाधानी