मुंबई : वकिल गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळातील एसटी आंदोलनात वकिलाचे कपडे घालून नाचल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काऊंसिल ऑफ महाराष्ट्राला याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यावरुन गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. पंरतु गुणरत्ने सदावर्ते यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.
हेही वाचा…“कृपया मी जी चिंता करतो, ती गांभीर्याने घ्या,” शरद पवारांचं थेट केंद्र सरकारला “त्याबाबत” पत्र
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅंड गोवा ने माझी सनद दोन वर्षासाठी निलंबित करण्याचा दिलेला निर्णय अवैध आहे. असं म्हणत गुणरत्ने सदावर्ते यांनी याचिकाद्वारे आवाहन दिलं होतं. यावर गुरूवारी उच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही तातडीचा दिलासा मिळालेला नाही. वकिल कायद्यातील तरतुदीप्रमाणे बीसीएमजीच्या निर्णयाविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे अपील करण्याचा पर्याय असल्याने आम्ही कोणताही आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट करून न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सदावर्ते यांची याचिका फेटाळली. तसेच त्यांनी बीसीआयकडे अपिल करण्याची सुचना केली.
हेही वाचा..रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोग पोलिसांच्या अहवालावर असमाधानी
महाराष्ट्र एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आघाडीच्या काळात आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दिला होता. याच वेळी त्यांनी वकिलांचा ड्रेस घालून आझाद मैदानात नाच केला होता. त्यानंतर वकिल सुशील मंचरकर यांनी याबाबत काऊंसिल ऑफ महाराष्ट्रला तक्रार दिली होती.
हेही वाचा…“माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर टिका झाली, परंतु फडणवीस यामुळे व्यथीत होणार नाहीत”, पंकजा मुंडे
महाराष्ट्र एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आघाडीच्या काळात आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दिला होता. याच वेळी त्यांनी वकिलांचा ड्रेस घालून आझाद मैदानात नाच केला होता. त्यानंतर वकिल सुशील मंचरकर यांनी याबाबत काऊंसिल ऑफ महाराष्ट्रला तक्रार दिली होती.
Read also
हेही वाचा…“उद्धव ठाकरे तुम्हाला फडतूस म्हणतायत, तुम्ही जर खरचं काडतूस आहात, तर मग एखादी गोळी चालवून दाखवा”, मनसेनचं आवाहन
हेही वाचा..रोशनी शिंदे प्रकरण..! महिला आयोगाने थेट पोलिसांना पाठविली नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
हेही वाचा…अजित पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू, गेल्या तीन महिन्यांपासून…
हेही वाचा…“रॅप साॅंगमध्ये ५० खोक्यांचा उल्लेख, एका तरूणाला अटक, ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा धोकादायक कारभार”
हेही वाचा…“पवार साहेबांनी जेव्हा कृषी विभागाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा देशाला निर्यातीची दारं खुली केली”