छत्रपती संभाजीनगर : राज्यात मागील काही महिन्यापासून राजकीय नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यातच आज छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयातील अवयव दानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते जमले होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संदीपान भूमरे यांच्या चांगलीच जुंगलबंदी बघायला मिळाली.
हेही वाचा…“राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
घाटी रूग्णालयाच्या अवयवदानाच्या क्रार्यक्रमाच्या निमित्ताने अंबादास दानवे यांनी सर्व अवयव दान करण्याची घोषणा केली. सार्वजनिक कार्यक्रम असून हा अवयव दानाची चळवळ संपुर्ण देशात झाली पाहिजे. यावेळी त्यांच्यासोबत संदीपान भुमरे देखील हजर होते. आम्ही एकमेकांची व्यासपीठावर प्रकृती विचारत होतो. यातच अंबादास दानवे यांचा मेंदू हा अवयव घ्यायला आवडेल. असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…““राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
संदिपान भुमरे यांच्या विधानावर अंबादास दानवे यांनी लगेच उत्तर दिलं. त्यांनी माझं मेंदू घेतला तरी चालेल. परंतु अशी वेळ कुणावरच येऊ नये. असंही ते म्हणाले. तसेच काळीज कुणाला द्याल. त्यावर ते मी माझं काळीज देशाला देणार. असं मिश्किल उत्तर अंबादास दानवे यांनी दिलं.
दरम्यान, या कार्यक्रमाला भाजपचे नेते गिरीश महाजन, एमआयएमचे खासदार इत्मियाज जलील, संदीपान भुमरे, अंबादास दानवे इत्यादी महत्वाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Read also
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अन् विकासासाठी भाजपसोबत यावं,” भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांचं आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील
हेही वाचा…“नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या बापाला शोधून काढावं, मग..” मनिषा कायंदेंच्या नवनीत राणांवर हल्लाबोल
हेही वाचा…मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात, विरोधकांची जोरदार टिका