मुंबई : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी आमच्यासोबत यावं. शरद पवार यांनी ज्या पद्धतीने इतर पक्षांची माफी केली. तसं तुमची देखील करतील. असं विधान पुण्याचे पालकमंत्री आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी आता प्रयत्न करावेत. असं म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार का ? अशी चर्चा सध्या राजकारणात सुरू झाली आहे.
हेही वाचा..शिरुर लोकसभेत भाजपा सुसाट, महाविकास आघाडी ‘कोमात’
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यांना हिंदुह्यदय बाळासाहेब ठाकरे यांनी जवळसुद्धा घेतलं नाही. ती काही काही लोकं भांडण लावून आपला स्वार्थ साधताहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून आपला अजेंंठा बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावं, ही आमची आता राजकीय आवश्यकता नाही. आम्ही त्यासाठी आता सक्षम आहोत. ही हिंदुत्वाची आणि विकासाची आवश्यकता आहे. पवार साहेबांनी अनेक पक्षांची माफी केली. तसं तुमची देखील करतील. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा…“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
आम्हाला जे काही प्रयत्न करायचे होते ते आम्ही केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे हे उद्धव ठाकरेंनीच ठरवले होते. पण शरद पवारांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला मुख्यमंत्री व्हायला लागले असं ठाकरेंचे म्हणणं होते. नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असले असते. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातीलच मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना फारसं वाईट वाटू नये. असं दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज”, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं मन किती मोठं आहे. हे मला माहिती आहे. गेली चाळीस वर्ष आम्ही बरोबर काम करीत आहोत. परंतु ते काहीही सहन करून घेणारे नाहीत. यातच कुणी आम्हाला बोललं तर आम्ही त्यांना सोडत नाहीत. उद्या समजा उद्धव ठाकरे म्हणाले की, रात गई बात गई तसेच उद्या हिंदूत्वाच्या मुद्यासाठी तर त्याची काही हरकत नाही. परंतु त्यांनी जसं केलं तसं आम्ही करणार नाही. तसेच एखादी गोष्ट जुळायची असेल तर त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील
हेही वाचा…“नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या बापाला शोधून काढावं, मग..” मनिषा कायंदेंच्या नवनीत राणांवर हल्लाबोल
हेही वाचा…मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…“राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा…““राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता