पिंपरी चिंचवड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही उपस्थिती लावली. यावेळी बनसोडे यांच्या गळ्यात भगवी शाल दिसून आली तसेच मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या कार्यालयातही गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
अण्णा बनसोडे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु गेल्या काही काळापासून त्यांची एकनाथ शिंदेंशी जवळीक वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्येच शिंदे आणि बनसोडे यांनी एकत्र गाडीतून प्रवास केला होता. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढवता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना समर्थन देण्याची उघड भूमिका त्यांनी घेतली होती. तसेच पक्षामध्ये देखील ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा
आज मुख्यमंत्री शिंदे यांनी आज थेट बनसोडे यांच्या कार्यालयाला देखील भेट दिली. यावेळी त्यांच्या गळ्यात घालण्यात आलेल्या भगव्या शालीने सर्वांचे लक्ष वेधले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, बनसोडे आगामी काळात शिवसेनेच्या वाटेवर तर नाहीत ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता बनसोडे राजकीय दृष्टीने काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसातून मोदी साहेबांचं १० तर फडणवीसांचं पाच ते सहा वेळा नावं घेतात”, दिपक केसरकर
हेही वाचा…“फडणवीसांच्या दौऱ्यात “भकास @ 40″ लागले,” बॅनर्स, भाजप शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…सावरकर, हेगडेवारांचा धडा कर्नाटक सरकारने वगळला, ‘हाच का कर्नाटक पॅटर्न’, फडणवीसांचा सवाल