मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी आढावा बैठकीचांही आयोजन करण्यात येत आहे. यातच महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक टिळक भवनात आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रदेशाध्यक्षांसमोरच दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात राष्ट्रीय युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष, बी. श्रीनिवास, इंचार्ज कृष्णा अल्लवरू तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमात कुणाल राऊत आणि दुसऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाली.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
भांडणा दरम्यान कार्यकर्त्यांनी सभागृहात असलेल्या खुर्च्या एकमेकांवर फेकल्या. यासंदर्भात एक व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे काॅंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यांमध्येच अशी भांडण होत असेल तर सामान्य नागरिकांनी काय करायचं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज टिळक भवन, दादर येथे पार पडली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बी.श्रीनिवास, इंचार्ज श्री. कृष्णा अल्लवरू तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. कुणाल… pic.twitter.com/HLqF4SMEvn
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीतून पत्ता कट होण्याची भीती? कि सत्तेत जाण्याची घाई? राष्ट्रवादीच्या आमदाराची शिंदेंशी जवळीक
हेही वाचा…कल्याण लोकसभा वाद, शिवसेनेची जाहिरात, श्रीकांत शिंदेंनी सगळचं केलं स्पष्ट
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र