मुंबई : गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील सात घटनापीठांच्या न्यायाधीशांकडे देण्यात आला. सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी महाराष्टाच्या सत्तासंघर्षाचा निकाल वाचून दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचं प्रतोदपद बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. तर मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करू शकत नाही. असंही सरन्यायाधीस धनंजय चंद्रचुड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण पुन्हा येणार का ? असा सवाल आता पुन्हा तयार झाला आहे.
हेही वाचा…..महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल..! निकालानंतर काय होऊ शकतं, काय घडू शकतं? वाचा सविस्तर
विधीमंडळ पक्ष राजकीय पक्षावर त्यांच्या धोरणासाठी अवलंबून असू शकतात. पण विधीमंडळ पक्ष राजकीय पक्षापासून वेगळा होऊन स्वतंत्र गट स्थापन करू शकतो, असा दावा करण्यात आला. पण घटनेमध्ये असं म्हटलेलं नाही. दहाव्या परिशिष्टाची सर्व रचना राजकीय पक्षावर अवलंबून आहे. त्यामुळे अध्यक्षांनी नव्या गटाच्या प्रतोदाची नियुक्ती कोणत्या आधारे मान्य केली. हे पाहावं लागेल. असंही कोर्टाने म्हटलं आहे.
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत
एकनाथ शिंदेंना पक्षनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे गटाकडून मंजूर करण्यात आला होता. अध्यक्षांना ३ जुलै रोजी पक्षातील फटीबाबत माहिती होती. दोन प्रतोद आणि नेत्यांच्या नियुक्तीचा मुद्दा अध्यक्षांना फुटीबाबत माहिती होण्यासाठी पुरेसा होता. पण अध्यक्षांनी त्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही. अध्य७ांनी यासंदर्भात स्वतंत्र चौकशी करायला हवी होती. पण या प्रकरणात अध्यक्षांनी गोगावलेंना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देणं अवैध होतं. असंही कोर्टाने म्हटलं आहे.
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
त्याचबरोबर १६ आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे देण्यात आला असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्याचबरोबर अजूनही काही उत्तारांची उकल होणे बाकी आहे. व्हीप फक्त राजकीय पक्षच देऊ शकतो. असं म्हणत मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करू शकत नाही. तसेच राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावायला नको होतं. असंही कोर्टाने म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…..एकनाथ शिंदेंना कोर्टाचा पहिला मोठा धक्का, भरत गोगावलेंचं प्रतोदपद बेकायदेशीर, सुप्रीम कोर्ट
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात ‘या’ पाच न्यायमुर्तींची महत्वाची भूमिका , वाचा संपु्र्ण यादी
हेही वाचा…“काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. “
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, अन् तेच आमचे नेते,” निकालाआधी फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हे यांची महापालिका भेट; पण पदाधिकाऱ्यांविनाच! शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा